ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

चोपडा (प्रतिनिधी)

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती, योग प्रशिक्षक नीना पाटील, वसंत पाटील तसेच समन्वयक अमन पटेल, अश्विनी पाटील, सुचिता पाटील आणि दिपाली पाटील उपस्थित होते. योग प्रशिक्षक नीना पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आसनांबद्दल प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती सांगितली. प्राणायाम विषयी सविस्तर माहिती सांगितली आणि प्रात्यक्षिक सादर केले. इयत्ता दहावीची विद्यार्थीनी तन्वी पाटीलने योग दिवसाचे महत्त्व सांगितले. शाळेतील शिक्षिका दिपाली पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी ऐरोबिक्सचे शानदार प्रदर्शन सादर केले. नृत्याच्या माध्यमातून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी विविध आसनांचे सादरीकरण केले. सर्व विद्यार्थ्यांसोबत मुख्याध्यापिका ममता न्याती आणि शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील प्रात्यक्षिकांमध्ये सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक पूजा चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षक भूषण गुजर यांनी केले. योग दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आकर्षक फलक रेखाटन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्याच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.