कुऱ्हा येथील स्व.अशोक फडके विद्यालायत आंतर राष्ट्रीय योग दिन साजरा

मुक्ताईनगर प्रतिनिधी

दि. २१ जून २०२३ बुधवार सकाळी ०७:३० ते ०९:०० या वेळेत प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी सार्व. संस्था, कुऱ्हा (काकोडा) ता. मुक्ताईनगर येथे ‘आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.

यावेळी श्री. योगेश नेटके सरांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायामाचे शारीरिक व मानसिक दृष्ट्या होणारे फायदे सांगितले व विध्यार्थ्यांकडून विविध योग प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून घेतले.

संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके (केंदीय संयोजक बेटी बचाव-बेटी पढाव)
यांनी आपल्या मनोगतातून योग दिनाचे महत्त्व सांगताना त्यांनी दैनंदिन जीवनात योगाचे महत्व सांगितले. योग आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा विश्वसंचार माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या कालखंडात झाला आहे.

आजच्या ९ व्या आंतरराष्ट्रीय योग्दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघात मा.नरेंद्रजी मोदी योग दिनाचे नेतृत्त्व करीत आहेत.

दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा व निरोगी जीवन
जगावे असा संदेश. राजेंद्रजी फडके यांनी विद्यार्थ्यांना दिला.

यावेळी संस्थेचे सचिव मा. श्री. भालचंद्र कुलकर्णी सर शाळेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. एस. चौधरी सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकावृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबी येथे नुकताच योग दिन उत्साहात साजरा

नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकताच नववा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. बी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना योगाच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन केले योग प्राणायाम दररोज आपण नित्य नियमाने केला पाहिजे यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहून मन शांत राहते व अध्ययन करण्यासाठी आपल्याला चालना मिळते असेही ते म्हणाले त्यानंतर योगशिक्षक श्री एस. के. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या आसनांचा व व्यायामांचा जसे अनुलोम-विलोम, कपालभाती, उज्जाई, भ्रामरी, ताडासन, शवासन आदीं विविध व्यायाम व प्राणायामा संदर्भात प्रत्यक्ष कृती करून विद्यार्थ्यांकडून ती कृती करून घेतली सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तीने व्यायामाचे महत्त्व घेऊन कृती केली याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर श्री राजाभाऊ राठोड श्री सुनील नागे शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे श्री विनायक इंगळे व आठवी, नववी व दहावीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी हायस्कूल कुऱ्हा येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

यावेळी संस्थेचे संचालक सन्माननीय श्री.अशोकभाऊ कांडेलकर,पर्यवेक्षक श्री.आर. पि.पाटील सर तसेच सर्व शिक्षक वर्ग यांनी विद्यार्थ्यांसोबत योगासने केली.
यावेळी क्रीडा शिक्षक श्री.ए.डी.पाटील सर यांनी स्वतः योगासने करीत विद्यार्थ्यांना योगासनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले. श्री.अशोकभाऊ कांडेलकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नियमित योगासने करण्याचे आवाहन केले.