इंटरपोलचे प्रमुख हाँगवेई यांचा राजीनामा; हाँगवेई चीनच्या ताब्यात

0

दक्षिण कोरिया- गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेले आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे (इंटरपोल) प्रमुख मेंग हाँगवेई यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मेंग हाँगवेई यांचा राजीनामा प्राप्त झाल्याचे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेकडून सांगण्यात आले आहे. मेंग हाँगवेई यांच्या राजीनाम्यानंतर दक्षिण कोरियाच्या किम जोंग यांग यांना हंगामी अध्यक्षपद देण्यात आले आहे

मेंग होंगवेई यांना चीनने ताब्यात घेतल्याचेही उघड झाले आहे. मेंग हाँगवेई बेपत्ता झाल्याचे समोर आल्याच्या काही दिवसांनंतर अखेर चीनने हाँगवेई यांना ताब्यात घेतल्याचे मान्य केले आहे. देशातील कायद्यांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मेंग होंगवेई यांची चौकशी सुरू असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. . 18 ते 21 नोव्हेंबर दरम्यान दुबईत संघटनेची बैठक होईल, त्यामध्ये नवा प्रमुख निवडला जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेने दिली.

हाँगवेई हे सप्टेंबरच्या अखेरीस दक्षिण-पूर्व फ्रान्समधील लिऑन येथील इंटरपोलच्या मुख्यालयातून बाहेर पडताना अखेरचे दिसले होते. त्यावेळी ते चीनला रवाना होणार होते. नोव्हेंबर 2016 मध्ये इंटरपोलच्या चीनमधील प्रमुखपदी निवड होण्यापूर्वी मेंग हे चीन सरकारमधील सार्वजनिक सुरक्षा विभागाचे उपमंत्री होते. या काळात त्यांनी गुप्तहेरांवर मोठा अंकुश राखला होता. मेंग हे चीनचे पहिले इंटरपोल अधिकारी राहिले आहेत. त्यामुळे इंटरपोलच्या 192 देशांतील कायदा अंमलबजावणी संस्थांशी ते जोडले गेले होते. २०२० पर्यंत ते इंटरपोलच्या प्रमुख पदी राहणार होते. हाँगवेई बेपत्ता झाल्याचं समोर आल्यापासून त्यांना चीननेच ताब्यात घेतलं असावं अशी दाट शक्यता वर्तवली जात होती.