मुंबई- मर्क्युरी फॅब्रिक्स प्रा. लि. ची एक शाखा आणि स्त्री-पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची प्रीमियम ब्रॅंड कंपनी इंटीमेट नेशनने ऑनलाइन स्टोरची सुरुवात केली आहे. इंटीमेट नेशन स्टायलिश अंतर्वस्त्रांच्या व्यापक श्रेणीत अत्याधुनिक डिझाइन्स, लोकप्रिय फॅशन आणि उत्कृष्ट कापड यांचा मिलाफ आहे. ऑनलाईन स्टोर लॉन्चसह ते ग्राहकाच्या अगदी दाराशी त्यांना आनंद देणारा शॉपिंग अनुभव देणार आहेत.
इंटीमेट नेशन पुरुषांसाठी देखील दर्जेदार डिझायनर आणि आरामदायक अंतर्वस्त्रांची निर्मिती करत आहे, ज्यात उच्च गुणवत्तेच्या व फॅशनेबल बॉक्सर्सचा समावेश आहे. धाग्याच्या निवडीपासून ते अॅंटी-मायक्रोबियल वस्त्र तयार होईपर्यंत प्रत्येक बाबतीत ते गुणवत्तेची काळजी घेतात. ते बांबूचे तंतू आणि गिझा व सुपीमा कॉटनमधून बनलेल्या सूती कापडाचे अनेक प्रकार वापरतात.
निर्मिती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर इंटीमेट नेशन आंतरराष्ट्रीय नियमांना अनुसरून आपल्या सर्व वस्त्रांची कसून तपासणी करते आणि आपल्या वाढत्या संख्येतील ग्राहकांना दोष-रहित उत्पादन मिळेल याची खातरजमा करते. त्यामुळे, ग्राहकांना आरामदायक अंतर्वस्त्रे त्यांच्या दारात ७०० रु.पासून उपलब्ध होतात.
इंटीमेट नेशनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव सचदेवा म्हणाले, “आत्तापर्यंत फिटिंगच्या बाबतीत तडजोड न करता उत्तम डिझाइन देण्यावर फोकस करणारा एकही ब्रॅंड नव्हता. आमचा ऑनलाइन ब्रॅंड या दोन्ही गोष्टींची काळजी घेतो व थीम आधारित कलेक्शन सादर करतो ज्यामध्ये आरामदायक फिटिंग, फंक्शनल फिनिश यांचे संयोजन असते व गंध-मुक्त आणि जंतू-मुक्त वस्त्र असल्याची, उत्कृष्ट कापड आणि स्त्रियांच्या प्रिंटेड अंतर्वस्त्रांची खात्री असते.
हे सारे किंमतीस अनुरूप मूल्य देणारे असते. मेट्रो आणि टायर-1 शहरांमधील शहरी उपभोक्त्यांपर्यंत आम्ही अगोदरच पोहोचलो आहोत आणि नावीन्यपूर्ण मार्केटिंग मोहिमांचा उपयोग करून टायर-2 आणि टायर-3 शहरांतील संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची आमची योजना आहे.