पुणे। दिल्ली संघाने पुण्यात पुणे संघाला घरच्या मैदानावर 97 धावांनी विजय नोंदविला.दिल्ली संघाला विजय मिळवून देणारा शिल्पकार ठरला संजू सॅमनन.त्याने आपल्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर 63 चेडूत 102 धावांची खेळी केली.त्यामुळे डिडि संघाची धावसंख्या 205 वर गेली.याचबरोबर संजू याने आयपीएल 2017 सीझन 10 मधील पहिले शतक ठोकले.तसेच संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये शतक ठोकणारा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.
63 चेडूत 102 धावांची खेळी
संजूने वयाच्या 23व्या वर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकले आहे. याआधी 2009 साली आयपीएलच्या दुसर्या मोसमात मनीष पांडेने वयाच्या 20व्या वर्षी शतक ठोकलं होते. आयपीएलमध्ये शतक ठोकणारा संजू सॅमसन हा बारावा भारतीय फलंदाज ठरला आहे.सॅमसनच्या त्या शतकाला ख्रिस मॉरिसच्या नऊ चेंडूमधल्या नाबाद 38 धावांच्या खेळीची जोड लाभली. त्यामुळेच रायझिंग पुणेविरुद्धच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सला 20 षटकांत चार बाद 205 धावांची मजल मारता आली.संजू सॅमसनने 63 चेंडूंत आठ चौकार आणि पाच षटकारांसह 102 धावांची खेळी उभारली. ख्रिस मॉरिसने नऊ चेंडूमधल्या नाबाद 38 धावांच्या खेळीत चार चौकार आणि तीन षर्टेंकारांची उधळण केली.