MI vs GT Qualifier 2 : आयपीएल २०२३ मधील दुसरा क्वालिफायर सामना आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स मध्ये होणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर आज जिंकलेल्या संघाचा फायनल सामना चेन्नईसोबत २८ मे रोजी अहमदाबाद येथे होणार आहे. लखनऊसोबत झालेल्या सामन्यात मुंबईने मोठ्या धावांनी विजय मिळवला होता. आता दोन्ही संघ कशी कमागिरी करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आजच्या सामन्यात गुजरात संघातील शुभमन गिल, हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी आणि राशिद खान कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर मुंबईच्या संघातील कॅमरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव आणि आकाश मधवाल या खेळाडूंकडून संघाला मोठ्या आशा आहेत.
मुंबई इंडियन्स संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, कॅमरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, विष्णू विनोद, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहनडॉर्फ, आकाश मधवाल.
गुजरात टायटन्स संघ :
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, हार्दिक पांड्या (कर्णधार), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.