IPL 2023-पंजाब किंग्जवर 4 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवत राजस्थान रॉयल्सच्या प्ले ऑफच्या आशाही झाल्या बळकट.
दोन्हीही संघासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या या सामन्यात विजयाचे पारडे दोन्ही संघाच्या बाजूने समसमान झुकत होते, कधी पंजाब,कधी राजस्थान जिंकेल असे वाटत असतानाच युवा ध्रुव जुरेलने राहुल चाहरच्या शेवटच्या आणि 20 व्या षटकातल्या चौथ्या चेंडूवर उत्तुंग षटकार मारत संघाला 4 गडी आणि दोन चेंडू राखून विजय मिळवून देताना 14 गुणांसह अंकतालिकेतही वर आणताना प्ले ऑफच्या आशाही बळकट केल्या तर याचवेळी पंजाब किंग्जचा यावर्षीचा प्रवासही समाप्त(IPL2023) केला आहे.
तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी खूप चुरस असल्याने आता प्रत्येक संघ पुढे काय होईल याचा विचार न करता आपण तरी मोठया फरकाने जिंकले पाहिजे याच विचाराने लढत असल्याने आता प्रत्येक सामना रंगतदारच होईल अशी अपेक्षा असलेल्या क्रिकेट रसिकांना आज सामन्याने आज एक अतिशय रोमहर्षक मेजवानी दिली.
धावांच्या सरासरीने धावा हव्या होत्या,सामन्यातले 17 वे षटक अतिशय सनसनाटी ठरले,अनुभवी रबाडाने पहिलाच चेंडू नोबॉल टाकला,त्याचा जबरदस्त फायदा उचलत परागने त्यावर षटकार ठोकला, पुढच्या चेंडूवर आणखी एक षटकार मारत त्याने विजयाचे समीकरण सोपे केले खरे,पण रबाडाने अखेरच्या चेंडूवर परागला बाद करत आपले काम पूर्ण केले,पण अजूनही पंजाब आणि विजयाच्या मधे उभा होता तो हेटमायर,पण 49 व्या षटकात सॅम करनने त्यालाही बाद करुन सामन्यात पुन्हा एकदा रोमांच निर्माण केला.शेवटच्या षटकात 9 धावा हव्या होत्या, अन धवनने पुन्हा एकदा शेवटचे षटक टाकण्याची जबाबदारी की जोखीम राहूल चाहरवर दिली, पहिले तीन चेंडू त्याने चांगले टाकत कर्णधाराच्या विश्वासाला खरे ठरवले, पण चौथ्या चेंडूवर ध्रुव जुरेलने जबरदस्त षटकार मारत आपल्या संघाला चार गडी राखून एक रोमहर्षक विजय मिळवून देताना पंजाब संघाचा आयपीएल सीझन 16 मधला प्रवासही (IPL 2023)समाप्त केला.
संघाच्या विजयात आपल्या वैयक्तिक दुसऱ्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सिंहाचा वाटा उचलणारा देवदत्त पडीकल सामन्याचा मानकरी(IPL2023) ठरला.
संक्षिप्त धावफलक
पंजाब किंग्ज
5 बाद 187
जितेश शर्मा 45,तायडे 19
सॅम करन नाबाद 49,शाहरुख नाबाद 41
सैनी 40/3,झांपा 26/1,बोल्ट 35/1
पराभूत विरुद्ध
राजस्थान रॉयल्स
6 बाद 189
यशस्वी जैस्वाल 50,पडीकल 51,हेट मायर 46,पराग 20, जुरेल नाबाद 10
रबाडा 40/2,करन 46/1,चाहर 28/1