आयपीएलवर सट्टा लावल्याची अरबाज खानची कबुली; चौकशी संपली

0

मुंबई-आयपीएल सट्टा प्रकरणी अभिनेता अरबाज खान यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावले होते. याप्रकरणी ते ठाणे पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे. आयपीएल सट्टा प्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे.  आयपीएलमध्ये  सट्टा लावल्याची कबुली अरबाज खान यांनी दिली आहे. सोनू जालान या बुकीला पोलिसांनी अटक केलेली आहे. सोनूला आपण ५ वर्षापर्यंत ओळखत असल्याची कबुली अरबाज खान यांनी दिली आहे. अरबाज खानवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.

 


अरबाज खान याला सोनू जालान तू सट्टा लावतो हे सगळ्यांना सांगून देईल अशी धमकी देत होता व सट्टा लावल्यास प्रवृत्त करायचा अशी कबुली अरबाज खानने दिली आहे. या प्रकरणात पाकिस्तानातील काही मंत्र्यांचा देखील सहभाग असल्याचे अरबाज खान यांनी सांगितले आहे.

अरबाज खान यांची चौकशी संपली असून ते पोलीस ठाण्यातून घरी गेले आहे. यावेळी त्यांनी माध्यमाला आपण पोलिसांना तपासात सहकार्य करणार असून जे सत्य आहे ते सगळे सांगितले असल्याचे सांगितले.