मुंबई इंडियन्स संघाच्या कार्यकारी संचालकपदी जहीर खान !

0

मुंबई-भारताचा माजी वेगवान गोलंदाज जहीर खानची मुंबई इंडियन्स संघाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स संघाने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

९२ कसोटी आणि २०० एकदिवसीय सामान्यांचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या जहीर खानने मुमबी इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. आता या वर्षी मात्र तो सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत दिसणार आहे.

जहीर खान हा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात कर्णधार आणि मेंटॉरच्या भूमिकेत होता. पण २०१८ साली त्याने IPL न खेळण्याचा घेतला. मात्र या वर्षी तो पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिसणार असून तो सपोर्ट स्टाफच्या भूमिकेत मुंबईच्या संघाला सहकार्य करणार आहे. तसेच मुंबई इंडियन्सकडून तो आयपीएल लिलावात सहभागी  आहे.