मुंबई :- घरगुती उपभोक्ता रोबोटिक्सचा जागतिक प्रणेता ब्रॅंड असलेल्या आयरोबोटचा (iRobot) एक्स्क्लुझिव्ह वितरक प्यूअरसाइट सिस्टम्सने आयरोबोटचे ‘ब्राव्हा ३९०टी’ हे नवीन रोबो-फ्लोर क्लीनिंग उपकरण भारतात उपलब्ध केले आहे. ब्राव्हा ३९०टी जमीनीवरील डाग आणि खराब झालेले कोपरे साफ करून देणारे अत्याधुनिक फ्लोर क्लीनर आहे ज्यात एक आयव्हरी रंगाचे, चौकोनी आकाराचे रोबोटिक फ्लोर मॉपिंग उपकरण आहे. कोणत्याही मॅन्युअल प्रोग्रामविना ब्राव्हा ३९०टी आपले सफाईचे काम सुरू करते. वापरण्यास सोपे असे हे उपकरण मात्र स्टार्ट, स्वीप आणि मॉप या तीन बटणांनी नियंत्रित करता येते व ते एकाच वेळी न थकता २१० मिनिटांपर्यंत, सुमारे १००० वर्गफुट फरशी पुसण्याचे काम करते. त्याच्या सुटसुटीत डिझाइनमुळे जेथे हात पोहोचू शकत नाही अशा जागी पोहोचून ते सहजरित्या सफाई करते.
भारतात ब्राव्हा ३९०टीला बॉटसाठी २ वर्षांची आणि बॅटरीसाठी १ वर्षाची वॉरंटी देण्यात आलेली असून विविध सुविधांनी युक्त असे हे उपकरण भारतात २५,२९० रुपयांत अमेझॉन डॉटइन संकेतस्थळावरून तसेच आयरोबोटच्या ऑफलाइन दुकानांतून विकत घेता येऊ शकेल.
यात आय अडॅप्ट २.० नेव्हीगेशन, नॉर्थस्टार नेव्हीगेशन क्यूब, प्रगत सेन्सर्स, प्रो-क्लीन रिझर्वोयर पॅड, जलद चार्जिंगची क्षमता, अधिक जागेची सफाई आदी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. याच्या पॅकेजिंगमध्ये नॉर्थस्टार नेव्हीगेशन क्यूब आणि ‘सी” बॅटरीज, अनेक उपयोग असलेले एक क्लीनिंग पॅड, फरशी कोरड्याने पुसण्याची मायक्रोफायबरची २ फडकी, फरशी ओल्याने पुसण्याची मायक्रोफायबरची २ फडकी, 1 प्रो-क्लीन रिझर्वोयर पॅड, २००० एमएएच एनआयएमएच, ईयू अडाप्टर, टर्बो चार्जिंग क्रेडल आदी सामानांचा समावेश आहे.