लोहपुरूष सरदार पटेलांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन

0

भुसावळात जंगी शोभायात्रा; भुसावळ शहर व परिसरात जयंती उत्साहात: रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीचा जल्लोष

भुसावळ: भुसावळ शहरातील शांतीनगर परीसरातून लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त शांतीनगर उत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. मोठ्या उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीत शहरातील दिग्गजांनी सहभाग घेतला. भुसावळचे आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, सिद्धीविनायक ग्रुपचे चेअरमन कुंदन ढाके, नगरसेवक प्रमोद नेमाडे, उत्सव समितीचे अध्यक्ष मयूर चौधरी, उपाध्यक्ष शुभम महाजन, यतीन ढाके, सामाजिक कार्यकर्ते गिरीश महाजन, वैभव भारंबे, हर्षल पाटील, प्रशांत पाटील, प्रशांत ढाके, सागर जावळे, पंकज चौधरी, रितेश भारंबे, रितेश कोल्हे, मिलिंद कोल्हे, इंद्रजीत चौधरी आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी दिग्गजांनी ढोलताशांच्या तालावर ठेका धरला. मिरवणुकीसाठी पाळधी येथील श्रीराम गृपचे ढोलताशा पथक होते.

सरदार वल्लभभाई पटेलांना अभिवादन

भुसावळ: लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त शहरातील जुना सातारा भागातील पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी माल्यार्पण केले. याप्रसंगी यतीन पाटील, मयुर चौधरी, रूपेश बर्‍हाटे, गोलु वायकोळे, गिरीष भिरूड, आदित्य चौधरी, गणेश टेकाडे, वृषभ धांडे, अनिकेत भिरूड, निलेश लोखंडे सुरज चौधरी आदी उपस्थित होते.

वरणगाव नगरपालिका

वरणगाव: भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीसह स्व.पंतप्रधान इंदिरा गांधी स्मृतीदिनानिमित्त वरणगावात नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, नगरसेविका रोहिणी जावळे, जागृती बढे, संजीव कोलते, बाळासाहेब सूर्यवंशी, गंभीर कोळी, रवी नारखेडे, रवी सोनार, संजय माळी, दीपक भंगाळे, अनिल तायडे, सुधाकर मराठे, गणेश कोळी आदी नगरसेवक , नगरसेविका व पालिकेचे पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

‘रन फॉर युनिटी’ निमित्त धावले भुसावळ रनर्सचे धावपटू

भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटूंनी देखील वल्लभभाई पटेल यांना आदरांजली म्हणून विशेष रनचे (रन फॉर युनिटी) आयोजन केले होते. गुरुवारी पहाटे सहा वाजता सर्व धावपटूंनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून धावण्यास सुरुवात केली.सुरुवातीस रेल्वे स्टेशनच्या दक्षिणेकडील बाजूकडून फिल्टर हाऊस, आर पी डी रोड व तेथून पुन्हा मैदानावर परत असा प्रवास केला. त्यानंतर काही धावपटूंनी जनजागृतीसाठी शहरातील जामनेर रोड व जळगाव रोड या प्रमुख मार्गावर धावून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या विशेष रनमध्ये भुसावळ स्पोर्टस् अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या धावपटू मीना नेरकर, प्रियंका कुलकर्णी, डॉ. पिंकी रत्नानी, तृप्ती नगरनाईक, अर्चना भगत, प्रवीण फालक, गणसिंग पाटील, प्रवीण वारके, बिट्टू कुमार वर्मा, जी.आर.अय्यर, अखिलेश कुमार कनोजिया, धीरेंद्र रामटेके, अनंत झोपे, आर.एस.ठाकूर, अशोक पाटील, दीपेश सोनार, प्रमोद शुक्ला, श्रीकांत नगरनाईक, सचिन मनवानी, प्रशांत बाविस्कर, अंकित पोद्दार, नीलेश लाहोटी, शेख रीझवान, चेतन पाटील, तरुण बिरीया, एस.बी.फीरके, प्रवीण पाटील यांनी सहभाग नोंदवला.

भुसावळ रेल्वे विभागातर्फे ‘रन फॉर युनिटी’ रॅली

भुसावळ: लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातर्फे भुसावळ येथे गुरूवारी सकाळी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या नेतृत्वात रन ऑफ युनिटी रॅली डीआरएम कार्यालय ते जळगाव नाक्यापर्यत रॅली काढण्यात आली. या रॅलीला सकाळी 7.30 वाजता डीआरएम गुप्ता यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरूवात केली. ही रॅली डीआरएम कार्यालयापासून सुरू होवून गांधी पुतळा, पंचमुखी हनुमान मंदिरावरून जळगाव नाक्याजवळील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापर्यत आणण्यात आल्यानंतर डीआरएम गुप्ता, एडीआरएम मनोजकुमार सिन्हा यांनी माल्यार्पण केले. यावेळी वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा, वरीष्ठ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, वरीष्ठ मंडळ यांत्रीक अभियंता रामचंद्रन यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शाखा अभियंता, रेल्वे स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक, स्काऊट गाईडचे विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.


राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

रॅली आटोपल्यावर डीआरएम कार्यालयात डीआरएम गुप्ता यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना पटेल जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवसानिमीत्त शपथ दिली. यावेळी मोठ्या प्रमाणावर डीआरएम कार्यालयातील कर्मचार्‍यांनी उपस्थिती होती.