आयसीसचा म्होरक्या ठार

0

वॉशिंग्टन: जगात आपल्या क्रूर चेहरा असणाऱ्या, निष्पाप नागरिकांचा बळी घेणाऱ्या ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ अर्थात आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याच्याविरोधात अमेरिकेनं मोठी कारवाई केली असल्याचं वृत्त आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आताच काहीतरी मोठं घडलंय असं ट्विट केल्यानं सगळ्या जगाचं लक्ष ते काय घोषणा करणार आहेत याकडे लागलं आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1188264965930700801

अमेरिकेने आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीचा खात्मा करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे, असं वृत्त रॉयटर्सच्या हवाल्यानं एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. त्यात अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘काही तरी मोठं घडलंय’ असं ट्विट केल्यानं बगदादी मारला गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप ठोस माहिती समोर येऊ शकलेली नाही.


अद्याप बगदादी संबंधित सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही. ट्रम्प पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करतील अशी माहिती व्हाइट हाऊसमधून देण्यात आली आहे. त्यामुळं ट्रम्प हे बगदादी संदर्भात मोठी घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही बगदादी मारला गेल्याचे वृत्त अनेकदा आले आहे. मात्र, त्याला दुजोरा मिळू शकलेला नाही.