आयएसआयएसचे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; अलर्ट जाहीर

0

तिरुवनंतपुरम: श्रीलंकेमधील साखळी बॉम्बस्फोटची घटना ताजी असतानाच आता आयएसआयएसचे सुमारे 15 दहशतावादी घुसण्याच्या तयारीत असल्याची भीती गुप्तहेर खात्याने वर्तवली आहे. दहशतवादी नौकेत स्वार होऊन लक्षद्वीपकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत असे अलर्ट नेहमीच येत असतात. मात्र यावेळी दहशतवाद्यांची नेमकी संख्याही सांगण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहत आहोत. तसेच किनारपट्टी भागात बंदोबस्त वाढवल आहे. 21 एप्रिल रोजी ईस्टर संडेच्या दिवशी श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर दक्षिण भारतात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मात्र श्रीलंकेतून आलेल्या या अलर्टनंतर 23 मेपासून सुरक्षा व्यवस्थेत अधिकच वाढ करण्यात आली आहे. केरळमध्ये अद्यापही आयएसच्या समर्थकांचे अस्तित्व असल्याचा गुप्तहेर यंत्रणांना संशय आहे. इराक आणि सीरियामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आयएसचा या दोन्ही देशांमधून सफाया करण्यात आला आहे. मात्र आता दक्षिणा आशियामध्ये पाळेमुळे पसरवण्यासाठी आयएसकडून प्रयत्न सुरू आहेत.