अध्यात्माद्वारेच धर्माची धारणा होते…… जेष्ठ प्रवचनकार हभप डॉ रविंद्र भोळे

पुणे | कोरेगावमूळ हवेली पुणे: धर्माची निर्मिती प्रत्यक्ष परमेश्वराने केली असे वेदात म्हटले असून धर्मापालन करणाऱ्यांचा नेहमी जय होतो. धर्म बाजारात विकत मिळत नाही तर धर्म धारण करावा लागतो. जगातील सर्व धर्म मानवजातीच्या कल्याणासाठी असून दया, क्षमा, शांतीचा संदेश देत असतात. सात्विक त्याग, सात्विक कर्म व सत्विककर्ता ह्याव्दारे धर्माचे रक्षण होउन धर्म मनुष्याचे रक्षण करतो. दया, करुना, संवेदना असतील तरच धर्म धारण होऊ शकतो. ह्यासाठी अध्यात्म महत्वाचे आहे. अध्यात्माद्वारेच धर्माची प्रेरणा मिळू शकते असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांनी येथे व्यक्त केले . श्री रामजन्म नवमी, श्री हनुमान जयंती निमित्ताने श्री जगतगुरु संत तुकाराम महाराज गाथा प्रवचन सोहळ्याचा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला. ह्या प्रसंगी हभप डॉ रविंद्र भोळे ह्यांनी प्रवचनाचे पुष्प गुंफताना वरील विश्लेषण केले . ह्या पुढे प्रवचनात मत व्यक्त करताना डॉ रविंद्र भोळे म्हणाले की धर्माद्वारेच नीती , न्याय, विवेक, दया, क्षमा, शांती ज्ञान, सात्विक कर्म, भक्ति व मोक्ष प्राप्ती व गुह्य गुपित ज्ञान ह्याचा मानवजातीला उलघडा होतो. म्हणून अध्यात्मिक प्रसार व प्रचार कार्ये महत्वपुर्ण आहेत.ह्या प्रसंगी दैनिक केसरी चे पत्रकार अमोल भोसले ह्यांनी डॉ रविंद्र महाराज भोळे उरुळीकांचन ह्यांना सन्मानीत केले. ह्या प्रसंगी हभप नितीन कड देशमुख, हभप सुरेश महाराज कांचन, हभप संभाजी महाराज आपूने , हभप हरिभाऊ मसलकर, हभप अक्षय रोडे, हभप ग्रामस्थ, भाविक भक्त, टाळकरी, विणेकरी,बहुसंख्येने उपस्थित होते.