भुसावळ जनतेच्या सहकार्यामुळेच मी योग्य व भयमुक्त कार्य करु शकलो

डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे नागरी गौरव समितीतर्फे जाहीर सत्कार

भुसावळ जनतेच्या सहकार्यामुळेच मी योग्य व भयमुक्त कार्य करु शकलो डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे नागरी गौरव समितीतर्फे जाहीर सत्कार नागरी गौरव समितीची संकल्पना नाना पाटील सर यांनी राबविली भुसावळ, ता. भुसावळकर जनतेने मला जे सहकार्य केले त्या सहकार्यामुळेच मी योग्य भयमुक्त चांगले काम करु शकलो. माझ्या कार्य मध्ये विशेषतः राजकीय हस्तक्षेप झाला नाही परिणामी माझ्या कारकिर्दीत एकही खोटा गुन्हा दाखल झाला नसेल याची खात्री देतो. असे मत उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी व्यक्त केले. वाघचौरे यांची बदली झाल्या निमित्ताने त्यांचा नागरी गौरव समितीतर्फे जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार संजय सावकारे, नव्याने आलेले डीवायएसपी श्रीं कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी संदिप चिद्रवार, गौरव समितीचे प्रमुख राध्येश्याम लाहोटी, , प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सोमनाथ वाघचौरे पुढे म्हणाले की इतर विभागांच्या तुलनेत भुसावळ विभागातील गुन्हेगारी कमी आहे. पण नागरीकांमध्ये पोलिसांनविषयी नकारात्मक दृष्टिकोन होता. येथील कार्यभार घेतल्या नंतर सर्व प्रथम पोलिसांनविषयी सामान्य जनतेमध्ये सकारात्मक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुर्वी वैयक्तिक वैम्यन्यसातून खोटे गुन्हे दाखल केले जात होते विशेषतः त्यात राजकीय गुन्ह्यांचे प्रमाण जास्त होते मात्र माझ्या कारकिर्दीत एकाही व्यक्तीवर खोटा गुन्हा दाखल झाला नसेल याची खात्री देतो. कार्यालयात परवानगी शिवाय व मोबाईलसह येण्याची मुभा मी दिली होती. आधी मोबाईल बाहेर ठेवण्याची परंपरा मी मोडीत काढली कारण छुपा कॅमेरा किंवा रेकॉर्डिंग केले तरी मला फरक पडणार नव्हता कारण मी खोटे काही बोलणार नव्हतो. तसे संस्कार माझ्यावर नव्हते. जे काही करायचे ते कायद्या नुसारच केले. येणाऱ्या प्रत्येकाचे ऐकुन घेण्यावर माझा भर होता. व्यापारी वर्गाला देखील धीर दिला परिणामी खंडणीचे प्रकार कमी झाले. अवैध सावकारी ही या शहराची मोठी डोके दुखी आहे. रेल्वे व नगरपालिका कर्मचाऱ्यांना याचा फटका बसतो. महिन्याला वीस टक्के दराने पैसे दिले जातात. वर्षाला २४० टक्के व्याज देणे अतीच होते. अश्या सावकारांवर कारवाई करुन त्यांना तुरुंगात पाठविले. तर काहींना समज दिली. असे वाघचौरे म्हणाले. गौरव समितीचे प्रमुख राध्येश्याम लाहोटी म्हणाले की भय मुक्त भुसावळ व भय मुक्त व्यापार करण्याची खात्री वाघचौरे साहेबांनी आम्हा व्यापाऱ्यांना पहिल्याच बैठकीत दिली होती. त्याप्रमाणे ते कायम आमच्या पाठीशी उभे राहिले. त्यांचे सामाजिक कार्य देखील तेवढेच महत्त्वाचे होते. असे लाहोटी म्हणाले. यावेळी आमदार संजय सावकारे, मुख्याधिकारी संदिप चिद्रवार, नुतन अधिकारी कृष्णकांत पिंगळे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, किरण कोलते, अॅड निर्मल दायमा, साबीर शेख, राजश्री सुरवाडे, संगीता भामरे, वैद्य रघुनाथ आप्पा सोनवणे, चॉंद तडवी, आनंद ठाकरे, शेख पापा, प्र.ह.दलाल आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. नागरी गौरव समिती चे समन्वयक नाना पाटील सर यांनी त्यांचा व नव्याने आलेले डीवायएसपी या विविध घटनांच्या संदर्भ देऊन केला . नागरी गौरव समितीतर्फे मानपत्र, शाल ड्रेस व वृक्ष आदी देऊन वाघचौरे परिवाराचा सत्कार करण्यात आला. नाना पाटील सर यांनी तयार केलेले मानपत्राचे चे वाचन अॅड नितीन खरे यांनी केले. शहरातील 42 पेक्षा जास्त सामाजिक संघटनांनी वाघचौरे साहेब यांचा सत्कार केला. प्रास्ताविक अॅड तुषार पाटील यांनी केले तर सुत्रसंचलन गौरव समितीचे समन्वयक नाना पाटील यांनी केले. आभार सुरेंद्र सिंग पाटील यांनी केले . या गौरव समितीमध्ये राधेश्यामजी लाहोटी अशोक जैन नागराणी रघुनाथ आप्पा सोनवणे डॉक्टर राजेश मानवतकर सौ रजनीताई सावकारे नाना पाटील सर सुरेंद्र सिंग पाटील गौतम चोरडिया रनर प्रवीण पाटील प्रा .प्रवीण फालक अॅड तुषार पाटील साबीर मेबर राजश्री सुरवाडे गोपाल चौधरी गल्लुदास छाजेड उमेश भाऊ नेमाडे अॅड नितीन खरे वैशाली प्रमोद पाटील प्र ह दलाल आनंद ठाकरे डॉक्टर लक्ष्मीकांत नागला डॉक्टर मकरंद चांदवडकर रवी निमानी याप्रसंगी यांचे व इतर नागरिकांचे ही सहकार्य लाभले .

आपल्या शहरात अनेक चांगले अधिकारी आलेत आणि गेलेत . पण डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांनी आपल्या कार्याचा ठसा जनसामान्यांच्या मनावर बिंबवला भुसावळ शहराला भयमुक्त करण्याचा प्र।यत्न व गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न केला . या अधिकाऱ्यांचं जाताना शहरातर्फे नागरिकांकडून गौरव केला गेला तर त्यांनाही अधिकाधिक चांगलं करण्याची इच्छा निर्माण होते आणि त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती म्हणून नागरिकांतर्फे सत्कार होणे आवश्यक आहे . ही संकल्पना विचार काही मान्यवर प्रतिष्ठित व्यक्तींकडे मांडला त्यांनीही लगेच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि अशा अधिकाऱ्यांचे कार्याचे गौरव सत्कार होणे आवश्यक आहे .असे सगळ्यांनी म्हटल्याने एक गौरव समिती निर्माण करून श्री डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांचा नागरि सत्कार करण्याचे ठरविले . भुसावळ शहरात प्रथमच पोलीस प्रशासनातील एका पोलीस अधिकाऱ्याचा नागरी सत्कार होत आहे .त्यांनी समाजात नागरिकांच्या हृदयामध्ये जे स्थान निर्माण केले त्यांच्या ऋणात राहून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .एक प्रथा परंपरा भुसावळ शहरात निर्माण व्हावी व सर्व समाजामध्ये या निमित्ताने एकत्रपणा यावा हा उद्देश या गौरव समितीचे निमित्ताने झाला

नाना शंकर पाटील सर

समन्वयक नागरी गौरव समिती भुसावळ