ITBP च्या जवानांसोबत पंतप्रधान मोदींनी केली दिवाळी साजरी

0

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी दरवर्षी जवानांसोबत असते. यावर्षी पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडमधील हर्षिल गावात आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. उंच बर्फाळ पर्वतरांगांमध्ये तुम्ही ज्या निष्ठेने कर्तव्य बजावताय त्यामुळे देशाला बळ मिळते. तुमच्यामुळे देशातील १२५ कोटी जनतेची स्वप्ने आणि भविष्य सुरक्षित आहे असे पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जवानांसोबत दिवाळी साजरी केल्यानंतर पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले व तिथे सुरु असलेल्या निर्माण कार्याचा आढावा घेतला. केदारनाथमध्ये पुनर्निमाणाचे काम कसे सुरु आहे याचा ते स्वतः आढावा घेत आहेत. काही अधिकाऱ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. केदारनाथ मंदिराचे दृश्य सध्या अत्यंत विहंगम असे दिसून येते आहे.