बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली विराजमान !

0

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलींच्या खांद्यावर आजपासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा धुरा सोपविण्यात आले आहे. आज बुधवारी २३ रोजी सकाळी त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे. यासोबत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचा 33 महिन्यांचे प्रशासन आज संपुष्टात आले आहे. त्यामुळे निवडून आलेले प्रतिनिधी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचा कारभार सांभाळणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या शिफारशींच्या आधारावर बीसीसीआयमध्ये 2017 मध्ये प्रशासकीय समितीची स्थापना केली होती.

अशी असणार गांगुलींची टीम
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला सौरव गांगुली बीसीसीआयचा 39 वा अध्यक्ष ठरला आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीची निवड एकमताने झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह यांची बीसीसीआयचे सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. तर उत्तराखंडचे महिम वर्मा नवे उपाध्यक्ष, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण धूमल खजिनदार आणि केरळचे जयेश जॉर्ज यांनी संयुक्त सचिव म्हणून पदभार स्वीकारला.