मुंबई-जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मारहाण करण्यात आल्याची घटना तीन दिवसापूर्वी घडली. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी संप पुकारलेला आहे. संप अद्याप कायम आहे. दरम्यान जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी संपकरी डॉक्टरांना चर्चेसाठी बोलविले आहे. काही डॉक्टरांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी गेले आहे. या चर्चेत काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागले आहे.
सायन डॉक्टरांचा पाठिंबा
या संपला सायन रुग्णालयाचे डॉक्टरांनी पाठिंबा देत संपावर जाण्याच्या निर्णय घेतला आहे. तोंडाला काळे रुमाल बांधून निषेध नोंदविण्यात येत आहे. दरम्यान रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी पॅरेलल ओपीडी सुरु करण्यात आली आहे.