मुंबई-जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. आज चौथ्या दिवशीही संप कायम असून रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. निवासी डॉक्टरांची मागणी मान्य केली जात नसल्याचे त्यांचा संप कायम आहे. काल जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी संपकरी डॉक्टरांना चर्चेसाठी बोलविले होते. मात्र या बैठकीत काही तोडगा निघालेला नसल्याचे बैठक निष्फळ ठरली. डॉक्टरांच्या या संपला इतर डॉक्टर्स संघटनेने पाठिंबा देत संपत सहभाग घेतला आहे.