जे. टी. महाजन स्कूल फैजपूर येथे एसएससी परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा गुणगौरव सोहळा संपन्न

न्हावी प्रतिनिधी दि 21 विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांसमवेत पालकांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असते. आपल्या पाल्यांच्या भवितव्याचा विचार करून पालकही पूर्ण कष्टाने आपल्या पाल्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. हा विचार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या पालकांचीही भूमिका महत्त्वाची ठरते; म्हणून जे. टी. महाजन इंग्लिश मिडियम फैजपूर येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा अंतर्गत यशवंत विद्यार्थी व त्यांचे पालकांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाप्रसंगी प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाच्या दहावीच्या निकालाबाबतची यशोगाथा वर्णन केली सोबतच पालकांनी आपल्या संस्थेवर व आपल्या विद्यालयावर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचा विद्यालयात प्रवेश केला व सर्व शिक्षकांनीही अथक परिश्रमाने विद्यार्थ्यांना घडवून शाळेचाही नावलौकिक वाढवला; म्हणून शिक्षकांचे व पालकांचे विशेष कौतुक केले. तदनंतर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून दिया रविंद्र वायकोळे, संयोगिता गिरीशसिंग राजपूत , सय्यद फातिमा नदीम अख्तर व कल्याणी मोहन चौधरी यांनी आपल्या मनोगतातून येथील शिक्षकांनी रुजवलेले संस्कार पुढील आयुष्यासाठी निश्चितच मोलाचे ठरतील यासाठी सर्व शिक्षकांचे ऋण व्यक्त केले याबद्दल त्यांचे ही आभार व्यक्त केले. तसेच विद्यालयीन जीवनात आलेले अनुभव सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.
यानंतर टीएमई सोसायटीचे अध्यक्ष शरद महाजनजी यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना संबोधित करताना यशस्वी लोकांच्या आयुष्यातील शालेय काळ हा कसा महत्त्वाचा ठरतो यासंबंधी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या आवडीनुसार आपल्या क्षेत्राची निवड करावी म्हणजे यशाची निश्चिती होते .यासाठीच विद्यालयाने तयार केलेले पोषक शालेय वातावरण व त्यातून तयार होणारा परिपक्व व शिस्तबद्ध विद्यार्थी निश्चितच यशस्वी होईल असा आशावाद व्यक्त केला व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गुणगौरव सोहळ्याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून अनिल किरंगे यांनी विद्यालयात त्यांच्या पाल्यास मिळालेल्या बौद्धिक ,मानसिक व शारीरिक सुयोग्य ज्ञानदानाने झालेल्या पाल्य प्रगतीसाठी एक पालक म्हणून आम्ही समाधानी आहोत यासाठी टी एम ई सोसायटीचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आणि शिक्षकवृंद यांचे आभार व्यक्त केले.
पुढे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतर्गत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, डायरी, पेन देवून व ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त करणाऱ्या एकूण १७ विद्यार्थ्यांचे डायरी, पेन व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यालयातील इ. ५ वी व इ. ८वी च्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परिक्षांतर्गत मिळविलेल्या यशाबद्दल त्यांना ही टिफिन बॉक्स देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी टी एम ई सोसायटीचे अध्यक्ष शरद जिवराम महाजन , उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी सेक्रेटरी विजय रघुनाथ झोपे, संचालक शशिकांत रामचंद्र चौधरी तसेच विद्यालयाचे प्राचार्य मोझेस जाधव (इ.मि.) , प्राचार्य नंदकिशोर सोनवणे (सेमी इ.मि.), पर्यवेक्षिका पुनम नेहेते, सर्व शिक्षकवृंद पालक वर्ग व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका मनिषा चौधरी यांनी केले तर उपशिक्षक ईश्वर चौधरी यांच्या आभारांती कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.