आता एसटीवर दिसणार ‘जय महाराष्ट्र’ची पाटी

0

मुंबई – राज्य परिवहन मंडळाच्या प्रत्येक बसवर आता ‘जय महाराष्ट्र’ची पाटी लावणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी कर्नाटकच्या लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र म्हणल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. बेग यांच्या फतव्याचा निषेध करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावर रावतेंचा ताफा कर्नाटक पोलिसांनी रोखला होता. आता रावतेंनी या घोषणेद्वारे एकप्रकारे बेग यांना प्रतीउत्तर दिले आहे.