जय श्री राम नारा बंगाली संस्कृतीशी संबंधीत नाही; अमर्त्य सेन

0

कोलकाता: पच्छिम बंगालमध्ये जय श्री राम बोलन्यावरून काही दिवसापूर्वी एकाला धावत्या लोकल मधून बाहेर फेकण्यात आले होते, सुदैवाने त्या व्यक्तीला काही जास्त इजा झाली नाही. जय श्री रामच्या नाऱ्यावरून बंगाल मध्ये अनेक गटात काही घटना झाल्या आहेत. यात बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पासून ते केंद्राच्या अनेक नेत्यांनी भाग घेतला होता. आता नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी या विषयी वक्तव्य केले आहे. जय श्री रामचा नारा हा नारा बंगाली संस्कृतीशी संबंधित नसून आता लोकांना मारहाण करण्यासाठी या नाऱ्याचा वापर होत आहे, असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माँ दुर्गा बंगाली लोकांच्या आयुष्यात सर्वव्याप्त आहे. अमर्त्य सेन जाधवपूर विद्यापीठातील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधला आहे. जय श्री राम नारा बंगाली संस्कृतीशी संबधित नसून, यापूर्वी मी बंगाल मध्ये कधी असे ऐकले नव्हते असेहि ते यावेळी म्हणाले.

लोकांना मारहाण करण्यासाठी याचा उपयोग केला जात आआहे. देशातिल काही भागामध्ये जय श्री रामचा नारा देण्यास्तही सक्ती करण्यात आलि आहे, त्यांनी या गोष्टीला नकार दिल्यामुळे मारहाण झालि असल्याचे त्यांनी सांगितले.