नवी दिल्ली: नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रीमंडळात भाजपाचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचा समावेश राहणार नाही. मला मंत्रीपद देऊ नका असे पत्र अरुण जेटली यांनी खुद्द नरेंद्र मोदी यांना दिले आहे. येत्या ३० रोजी होणाऱ्या मंत्रीमंडळात आपला समावेश करू नका, कारण गेल्या काही दिवसापासून अरुण जेटली यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नव्या सरकारमध्ये मला मंत्री बनविण्याचा विचार करू नका, असे त्यांनी आपल्या पत्रात लिहले आहे.
अरुण जेटली यांनी म्हटले आहे की, गेल्या १८ महिन्यापासून माझी प्रकृती खराब असून मला दिलेले पद मी व्यवस्थित सांभाळू शकणार नाही. असे जेटली यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.