भरदिवसा आदर्शनगरात व्यापार्‍याचे घर फोडले ; 1 लाखांच्या रोकडेसह 6 तोळे दागिणे लंपास

0

जळगाव – शहरातील आदर्श नगरातील धान्य व्यापार्‍याच्या घरी भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी 1 लाख रुपये रोख आणि 6 तोळे सोने लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी 3.30 वाजेच्या घडली. दुपारी 2.15 वाजता ते 3.30 अशी सव्वा तासात चोरट्यांनी हात दाखविला

या बाबत माहिती अशी की, रितेश अंशीराम मंधान वय 35 रा. प्लॉट 5, दुर्वांकुर अपार्टमेंट, प्लॅट क्रमांक 11, गणपती नगर हे आपल्या पत्नी अनिता आणि मुलगा देवेश सह राहतात. रितेश यांचे दाणा बाजारात कृष्णा ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. दुपारी 2.15 वाजता घराला कुलूप लावून पत्नी अनिता ह्या रितेश यांना जेवणाचा डबा द्यायला गेल्या होत्या. त्यानंतर त्या बाजारात खरेदी करण्यासाठी निघून गेल्या. जेवण झाल्यानंतर रितेश घरी दुपारी 3.30 वाजता घरी आले. त्यांनी त्यांच्याजवळील एका चावीने दरवाजा उघडला. चोरट्यांनी दोन बेडमधील फर्निचर कपटातून कपड्यांचे सामान अस्तव्यस्त करून एक लाख रूपये रोख आणि सहा तोळे सोने असे एकूण 2 लाख 80 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता.

संपर्कातील, घरातील व्यक्तीने प्रकार केल्याचा संशय
माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक निलाभ रोहन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम, रामानंद नगर पोलीस निरीक्षक दिलीप बुधवंत यांच्यासह फिंगर प्रिंट आणि श्वान पथकाने पाचारण केले. मुख्य दरवाजाला कोणत्याही प्रकारचे निशाण किंवा नुकसान न करता चोरी केली आहे. याबाबत पोलीस प्रशासनासमोर चोरी करणारा घरातील किंवा आजूबाजू राहणारे एखादा संपर्कातील व्यक्ती असावा असा संशय आहे. अपार्टमेंटमध्ये खाली राहत असलेला वॉचमन प्रल्हाद तुळशीराम पवार याचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. तसेच चौथी चावी पांडे कुटुंबियांकडे राहत असल्यामुळे पोलीसांची संशयांची सुई त्यांच्याकडे गेली. त्यामुळे विभागीय पोलीस अधिकारी रोहन यांनी पांडे यांच्या घराची देखील झडती घेतली आहे.