मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवरील घटना ः एअरबँग उघडल्याने अनर्थ टळला
जळगाव- दोन दिवसांपूर्वी मुंबई व तेथून खाजगी कामानिमित्ताने मुंबई येथील मित्रांसमवेत मर्सिडीज कारने कोल्हापूरकडे जात असतांना अचानकपणे झालेल्या अपघातात माजी महापौर ललीत कोल्हे यांच्यासह सोबतचे दोघे मित्र बालंबाल बचावले आहे. शनिवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात कार 40 ते 50 फुटापर्यंत दुभाजकारवर आदळत गेल्याची माहिती मिळत असून सुदैवाने कारच्या सर्वच एअरबॅग उघडल्याने अनर्थ टळला. कारचे समोरील चाक फुटल्याने अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून कारचा समोरील भाग चक्काचूर झाला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार असे की, जळगाव येथील माजी महापौर तथा विद्यमान भाजपचे नगरसेवक ललीत कोल्हे हे दोन दिवसांपूर्वी मुंबईला गेले आहेत. शनिवारी ते मुंबई येथील मित्र अनुज शेठ व आणखी मित्रासह कोल्हापूरकडे जायला निघाले. अनुज भाईच्या यांच्या कारने (एम.एच.04 जी.जे.9924) महामार्गाने मार्गस्थ झाले. अनुज हे कार चालवित होते. तर त्याच्या शेजारील ललीत कोल्हे बसले होते. अचानक सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास लोणावळ्यानजीक एक्स्प्रेस हायवेवर कार अचानक रस्त्यालगतच्या 40 ते 50 फुटापर्यंत दुभाजकावर आदळत गेली. नेमका काय प्रकार घडला हे चालक अनुज सह ललीत कोल्हे यांनाही कळला नाही. कार थांबल्यावर कारमधून बाहेर पडल्यावर तिघांना अपघात झाल्याचे समजले. अचानकपणे कारचे समोरील चाक फुटल्याने अपघात झाल्याचे समजते. कारमधील एअरबॅग उघडल्याने सुदैवाने तिघे बचावले. अपघात इतका जोरदार होता की कारच्या समोरील भाग चक्काचूर झाला आहे. . दरम्यान कारचालक अनुज यांना डोक्याला दुखापत झाल्याने दुसर्या वाहनाने ते उपचारासाठी खाजगी रुग्णालयाकडे रवाना झाले झाल्याचे वृत्त आहे.