जळगावच्या इंद्रप्रस्थ नगरातील तरुणाचा सुरतला खून

0

कानबाई विसर्जनासाठी गेला होता मावशीकडे ; मिरवणुकीत नाचतांना धक्का लागल्याने वाद

जळगाव : गुजरात राज्यातील सुरत परिसरातील नवागाम डिंडोली येथे मावशीकडे कानबाई उत्सव साजरा करण्यासाठी गेलेल्या जळगावातील इंद्रप्रस्थ नगर येथील रहिवासी रितेश सोमनाथ शिंपी (वय 18) या तरुणाचा खून झाल्याची घटना सोमवारी घडली. सुरत येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना मंगळवारी सकाळी रितेशची प्राणज्योत मालवली. सायंकाळी मृतदेह जळगावात आणण्यात येवून शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कानबाई विसर्जन मिरवणुकीत वादातून खुपसला चाकू
सुरत परिसरातील नवागाम डिंडोली येथे रितेशची मावशी राहते. प्रकाश पंडीत सोनवणे असे काकाचे नाव असून त्यांच्याकडे कानबाई उत्सव साजरा होता. कानबाईचे सोमवारी विसर्जन असल्याने त्यासाठी रितेश हा जळगावातून शनिवारी रात्री रेल्वेने सुरत येथे पोहचला. सोमवारी नियोजनाप्रमाणे तो कानबाई विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला. या मिरवणुकीत नाचत असतांना धक्का लागल्याने अज्ञात तरुणांची त्याचा वाद झाला. वादाचे रूपांतर शाब्दीक चकमकीतून हाणामारीत होतदोन युवकांमधील एकाने त्याच्याजवळील धारदार चाकू काढत रितेशच्या पोटातच घातला. या चाकूरितेशच्या पोटात खोलवर रुतल्याने रितेश यास चाकूसमवेतच खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी रितेशवर शस्त्रक्रिया करत रितेशच्या पोटात रुतलेला चाकू काढला. मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान रितेश शिंपी याचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. याबाबत दिंडोली पोलिस स्थानकात सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांही संशयित युवकांना अटक झाली असल्याचे विश्‍वसनीय वृत्त आहे.

तुलसी अ‍ॅग्रोमध्ये होता कामाला
रितेशचेच्या पश्‍चात आई, कल्पना, वडील, मोठा भाऊ, वहिनी, तीन बहिणी असा परिवार आहे. तीन बहिणी तसेच भावेश विवाहित आहेत. वडील सोमनाथ पंढरीनाथ शिंपी हे रेमंड कंपनीत नोकरीला होते. ते सेवानिवृत्त झाले असून त्यांच्या जागी रितेशचा मोठा भाऊ भावेश सद्यस्थितीत नोकरीला आहे. तर रितेश तुलसी अ‍ॅग्रो या कंपनीत कामाला होता. सोमवारी कानबाई विसर्जन मिरवणुकीनंतर तो रात्री जळगावकडे परतणार होता. मात्र त्यापूर्वीच सायंकाळी त्याचा वादातून खून झाला.