सहकार विभागाचा ताण वाढला : पाच सहाय्यक निबंधकांची बदली
जळगाव- जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील सहाय्यक निबंधकांची पदे रिक्त असल्याने सहकार विभागावर कामाचा ताण वाढलाच आहे. पतसंस्थांच्यादृष्टीने अडचणीतील जिल्ह्यात तब्बल नऊ पदे रिक्त असल्याने ठेवीदारांना न्याय मिळणार कसा ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्हा सहाय्यक निबंधकांची जिल्ह्यात दहा ठिकाणची पदे रिक्त आहे. त्यात सहाय्यक निबंधक यावल, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, एरंडोल, पारोळा, भडगाव, पाचोरा यांचा समावेश आहे. रिक्त जागांमुळे जिल्ह्यातील ठेवीदारांच्या ठेवीच्या वसूलीसह अनेक प्रश्न कायम आहेत. जिल्ह्यातील पाच सहाय्यक निबंधकांच्या बदल्यांचे आदेश सहकार आयुक्तांनी काढले आहेत. यात बोदवडचे सहाय्यक निबंधक आर.एम.जोगदंड यांची चाकूर (जि.लातूर) येथे, मुक्ताईनगरचे सहाय्यक निबंधक ए.डी.बागल यांची शिरपूर (जि.धुळे), जळगावचे सहाय्यक निबंधक आर.एस.भोसले यांची वाडा, (जि.पालघर), जामनेरचे सहाय्यक निबंधक एम.आर.शहा यांची जळगाव, पाचोरा सहाय्यक निबंधक पी.एस.पाटोळे यांची चांदवड (जि.नाशिक) येथे बदली झाली आहे. भुसावळ येथील सहाय्यक निबंधकपदी पुणे येथील सहाय्यक निबंधक एन.के.सूर्यवंशी यांची बदली झाली आहे.
चौदा नायब तहसीलदारांच्या बदल्या
जिल्ह्यात महसूल अधिकार्यांचे बदल्यांचे सत्र अद्याप सुरूच आहे. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील चौदा नायब तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यात (कंसात बदली झालेले ठिकाण) ःनायब तहसीलदार- अधिकार पेंढारकर (उपविभागीय कार्यालय चाळीसगाव), निवडणूक नायब तहसीलदार कल्पना पाटील (नायब तहसीलदार स्वागत शाखा, जळगाव), पारोळा नायब तहसीलदार-एन.झेड. वंजारी (नायब तहसीलदार पारोळा), चोपडा नायब तहसीलदार-एस.वाय.साळुंके (नायब तहसीलदार फैजपूर), चाळीसगावचे पुरवठा तपासणी अधिकारी जी.ई.भालेराव (नायब तहसीलदार भडगाव), नायब तहसीलदार एस.एस.भावसार (नायब तहसीलदार एरंडोल), अमळनेर गोदाम व्यवस्थापक आर.एस.जोशी (नायब तहसीलदार एरंडोल), अमळनेर पुरवठा तपासणी अधिकारी डी.एम.वाडीले (नायब तहसीलदार धरणगाव), बोदवड निवडणूक नायब तहसीलदार बी.डी.वाडीले (गोदाम व्यवस्थापक भुसावळ), भुसावळ नायब तहसीलदार एस.एस.निकम (नायब तहसीलदार भुसावळ), एरंडोल नायब तहसीलदार सी.बी.देवराज (गोदाम व्यवस्थापक जळगाव), अमळनेर नायब तहसीलदार आर.आर.ढोले (पुरवठा तपासणी अधिकारी चाळीसगाव), भडगाव नायब तहसीलदार मुकेश हिवाळे(नायब तहसीलदार पाचोरा) यांचा समावेश आहे.