जळगाव: फेरफार अर्ज मंजूर नसतांनाही जिल्हा परीषदेच्या शिक्षणाधिकार्यांनी भोईटे गटाला सह्यांचे अधिकार दिले होते. दरम्यान यासंदर्भात जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिशिष्ट १ची माहिती मागविली आहे.
गेल्या काही महिन्यापासुन वादाच्या भोवर्यात असलेल्या मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या परिशिष्ट एक बाबत धर्मदाय आयुक्तांकडे दोन्ही गटाकडून हरकती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादात परिशिष्ट एकवर कोणत्याच गटाचे नाव नसताना शिक्षणाधिकार्यांनी अनधिकृतपणे भोईटे गटाला शासनाच्या पत्राचा अभ्यास न करता सह्यांसाठी मान्यता दिली आहे. परिशिष्ट १ देखील शिक्षण विभागाकडे उपलब्ध नसतांना हा निर्णय घेतला असल्याच्या तक्रारी असल्याने सीईओंनी परिशिष्ट १ ची माहीती उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एस.अकलाडे यांना आदेश करून मागविली आहे.मविप्र बाबत शासनाच्या पत्रानुसार कारवाई केली असुन अधिकार देण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी देविदास महाजन यांनी यापुर्वीच स्पष्ट केले आहे.मात्र शिक्षणाधिकार्यांनी परिशिष्ट एकवर भोईटे गटाचे नाव नसतांना व हरकती असतांना हा निर्णय घेतला असल्याच्या तक्रारी असल्याने आता सीईओंनी या परिशिष्ट एक ची माहीती मागविली आहे.तसेच आदेश त्यांनी अकलाडे यांना दिले आहे.
शिक्षणाधिकारी महाजन रडारवर
मविप्र संस्थे बाबत धर्मदाय आयुक्तांकडे दोन्ही गटांनी फेरफार अर्ज यापुर्वी सादर केले होते.मात्र त्यास मान्यता नाही.परिशिष्ट १ फेरफार अर्ज मंजुर नसतांना व उपलब्ध नसतांना भोईटेगटाकडे अधिकार देण्याचे शिक्षणाधिकार्यांचे प्रयोजन काय? असा सवाल उपस्थित होत असल्याने शिक्षणाधिकारी देविदास महाजन पुन्हा सीईओंच्या रडारवर आले आहे.