जळगावात पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या !

0

जळगाव: पोलीस मुख्यालयातील बँड पथकातील एका पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. जयवंत दिलीप वाडे असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलीस लाईनमध्ये ते वास्तव्यास होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. जयवंतच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्याच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.