गांधी मार्केटमध्ये दुकानात शॉक लागून तरुणाचा मृत्यू

0

जळगाव : इलेक्ट्रीक दुकानात काम करत असताना विजेचा शॉक लागून श्रीकांत प्रमोद सपके (19) रा. 134 मारोतीपेठ जुने जळगाव या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी शहरातील गांधी मार्केटमध्ये घडली.

श्रीकांत सपके याने नुकतेच आयटीआयमध्ये इलेक्ट्रीशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रशिक्षण घेण्याच्या अनुषंगाने तो गांधी मार्केटमधील निशांत इलेक्ट्रीकल्स या दुकानावर कामाला जात होता. आज इलेक्ट्रीशियने काम करत असताना श्रीकांत यास विजेचा शॉक दुपारी अडीच ते पावणे तीन वाजेच्या सुमारास शॉक लागला. दुकान मालकांसह इतरांनी श्रीकांत याला तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती तरूणास मृत घोषीत केले. श्रीकांतच्या पश्चात वडील, आई निकिता, लहान भाऊ लोकेश तसेच काका सुरेश सपके, काकू असा परिवार आहे. भाऊ लोकेश हा अकरावीला शिक्षण घेत असून आई निकिता गृहीणी आहे.

सोमवारी रात्री मित्रांसोबत केले होते नृत्य
जुने जळगावातील वीर बाजी प्रभू मित्र मंडळाने गणपती बसविला आहे. सोमवारी रात्री याठिकाणी श्रीकांत याने मित्रांसोबत नृत्य केले होते. व दुसर्‍या दिवशी दुर्देवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. कोणत्याही उपक्रमात श्रीकांत नेहमी अग्रभागी असायचा, अशा आठवणींना त्याच्या मित्रांनी रूग्णालयात उजाळा दिला. याप्रकरणी शनी पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.