धुळे: येथील विशेष न्यायालयात सुरु असलेल्या जळगाव घरकुल प्रकरणाची आज सुनावणी झाली. अर्धा तास कामकाज चालल्यानंतर आता याप्रकरणी पुढील सुनावणी २७ जूनला होणार आहे. आज सर्व संशयित आरोपी न्यायलयात हजर झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील लावण्यात आला होता. न्यायालय आवारात १० पोलीस अधिकारी, ७४ पोलीस कर्मचारी, आरसीपीचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. जळगाव घरकुल घोटाळ्याचे काम पाहणाऱ्या जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग 1 सृष्टी निळकंठ या हजर नव्हत्या, त्यामुळे जिल्हा न्यायाधीश वर्ग-2 एस.आर.उगले धुळे यांच्याकडे कामकाज झाले. या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.