जळगाव:- मागच्या आठवड्यात नुकतीच सुरू झालेली जळगाव- चोपडा (खर्दे व नांदेड मार्गे) एस.टी महामंडळाकडून प्रवाशांकरीता सुविधा चालु करण्यात आली होती, मात्र दोन दिवस सदर एस.टी चालवून अचानक बंद करण्यात आली होती. यामुळे पुन्हा प्रवाशांची गैरसोय होण्यास सुरूवात झाली होती. या बाबतीत गावातील श्री. रडे व भीमराव हरि कोळी यांच्यासह इतर नागरिकांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना व भरत सैंदाणे तालुका उप प्रमुख युवासेना धरणगाव यांच्याकडे सदर बाबतीत तक्रार केल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून प्रवाशांसाठी बससेवा पूर्ववत व्हावी, असे प्रवाशांचे म्हणणे मांडल्यावर तात्काळ सुरु होण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार लागलीच दुसऱ्या दिवशी बस पुन्हा जळगाव ते नांदेड मार्गे चोपडा पूर्ववत करण्यात आली. नांदेड व ईतर परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. तात्काळ बस सुरू केल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत. आमच्या गुलाब भाऊच काम गयरं फास्ट, अशी चर्चा सध्या परिसरात रंगू लागली आहे.