शिरसाड येथील दुचाकी चोरास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक

0

जळगाव- यावल तालुक्यातील चिखली येथून दुचाकी चोरली ही दुचाकी घेवून हिंडल्याने त्याची खबर मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने शिरसाड येथील दुचाकी चोरास ताब्यात घेतले आहे. त्याने दुचाकी चोरीची कबूली दिली आहे.

फैजपूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे. गुन्हा घडल्यापासून हा संशयित फरार होता. स्थानिक गुन्ह शाखेचे सुरत पाटील यांना शिरसाड येथील संशयित चोरीची दुचाकी घेवून वावरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याबाबत त्यांनी पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना कळविले. त्यांनी सुरज पाटील यांच्यासह स.फो.अशोक महाजन पोहेकॉ अनिल जाधव,रविंद्र पाटील ,सुधाकर अंभोरे ,युनुस शेख सरज पाटील, दिपक पाटील योगेश वराडे व चालक इंद्रीस पठाण पथकास रवाना केले. पथकाला चोरीच्या मोटारसाईकलसह येतांना दिसताच त्याची खात्री करुन त्यास मोटारसाईकलसह ताब्यात घेवून त्याच्याजवळ असलेल्या मोटारसाईकल बददल विचारपूस केली असता त्यांने सदर मोटारसाईकल चिखली ता.यावल या ठिकाणाहून चोरी केल्याची सांगीतले. त्यानुसार त्यास फैजपूर येथील गुन्हयामध्ये चोरीस गेलेल्या मोटारसाईकलसह फैजपूर पोलील ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.