मकरा पार्कसह दोन ठिकाणी केली होती घरफोडली ; 2 लाख 1 हजार 339 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील शिरीन अपार्टमेंटमधिल खुर्शिद हुसेन मजहर यांचे बंद फ्लॅटच्या दरवाज्याचे कुलुप तोडून अज्ञात इसमाने त्यांच्या कपाटातील सोन्याचांदीचे दागिने व रोख असा 1 लाख 74 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला होता. त्याच दिवशी शहरात दोन ठिकाणी घरफोडी व एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला होता. या घटनांमधील संशयित धुळे येथील अट्टल गुन्हेगार पप्पु शहाबान हसन अंन्सारी हा शहरातील आकाशवाणी चौकात असल्याची पक्की टीप स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून दागिण्यांसह 2 लाख 1 हजार 339 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एलसीबीचे पथकाला लागला संशयिताचा सुगावा
पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्था.गु.शा.चे पो.नि. बापु रोहम यांना तपासाच्या सुचना केलेल्या होत्या. त्यानुसार पो.नि. रोहम यांनी एलसीबीकडील स.फौ. चंद्रकांत पाटील, अशोक महाजन, हवलदार अनिल इंगळे, संतोष मायकल, सुनिल दामोदरे, भास्कर पाटील, विजयसिंग पाटील, रमेश चौधरी, मिलींद सोनवणे, विजय पाटील, परेश महाजन, दर्शन ढाकणे, इद्रीस पठाण तसेच तांत्रिक माहिती करीता पो.हे.कॉ. विजय पाटील, नरेंद्र वारुळे व दिनेश बडगुजर यांना नेमले होते. पथकाने घटनास्थळावरून संशयीत आरोपीचे वर्णन व त्याच्या हालचाली तसेच गुन्ह्यांच्या पध्दतीवरुन हा गुन्हा धुळे येथील अट्टल गुन्हेगार पप्पु शहाबान हसन अंन्सारी याने केला असल्याची खात्री केली. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून पथकाने धुळे येथे जावून चौकशी केली असता आरोपी हा जळगाव जिल्ह्यात सक्रिय असल्याचे समजले.
आकाशवाणी चौकातून केले जेरबंद
पप्पु शहाबान हसन अंन्सारी हा आकाशवाणी चौकात आसल्याची माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता 54 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळून आले. त्यात दोन सोन्याच्या बांगड्या व 5 अंंगठ्यांचा समावेश आहे. असा 2 लाख 1 हजार 339 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्याने उपरोक्त गुन्हा केल्याचे कबुल केले असून त्याच्याकडुन अजुन काही गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे