Jalgaon Loksabha Live: उन्मेष पाटीलांना २ लाखांपेक्षा अधिक आघाडी !

0

जळगाव लोकसभा निकालाचे अचूक अपडेट जाणून घेण्यासाठी हि लिंक रिफ्रेश करत रहा.

जळगाव: आज लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदार संघात भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे. रावेरमधून रक्षा खडसे आणि जळगावमधून उन्मेष पाटील आघाडीवर आहे. रक्षा खडसे यांना १६ व्या फेरीअखेर २ लाख १५ हजार ७५३ मतांची आघाडी मिळाली आहे. त्यांना ४ लाख ७१ हजार ६७१ तर त्यांचे प्रमुख विरोधी डॉ.उल्हास पाटील यांना २ लाख ३५ हजार ९१८ मते आहेत.

जळगावमधून उन्मेष पाटील आघाडीवर आहे. उन्मेष पाटील यांना २ लाख १९७२७ पेक्षा अधिक आघाडी आहे.

विजय जवळपास निश्चित असल्याने भाजपकडून जल्लोष सुरु झाला आहे. उमदेवार उन्मेष पाटील हे भाजप कार्यालयात दाखल झाले असून त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

२.४१: रक्षा खडसे ४ लाख ७१ हजार ६७१ मत घेऊन आघाडीवर

२.४४: उन्मेष पाटील यांना ३ लाख ८१ हजार ५९४ मते मिळाली असून ते राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यापेक्षा २ लाख १९७२७ मतांनी आघाडीवर आहेत.

१.२७: उन्मेष पाटील हे ३ लाख ३१५ मतांसह आघाडीवर आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी गुलाबराव देवकर यांना १ लाख १८ हजार ९७३ मते मिळाली आहेत.

१.१६: रक्षा खडसे ३ लाख २९ हजार ५० मतांसह आघाडीवर आहेत.

१२.५७: उन्मेष पाटील २ लाख ६९ हजार ५२५ तर रक्षा खडसे २ लाख ७४ हजार ९५६ मतांसह आघाडीवर आहेत. उन्मेष पाटील १ लाख ६२ हजार मतांनी तर रक्षा खडसे १ लाख ३० हजार मतांनी आघाडीवर आहेत.

१२.४२: तेराव्या फेरीअखेर जळगावमधून उन्मेष पाटील २ लाख ३९ हजार ५८३ (१ लाख ७७ हजाराची आघाडी) तर रावेरमधून रक्षा खडसे २ लाख ४३ हजार ७८६ मतांसह (१ लाख ६९ हजाराची आघाडी) आघाडीवर आहे. जळगावमधून राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना ९५ हजार ५९५ तर रावेरमधून १ लाख ३२ हजार ३७४ मते आहेत.

१२.१३: जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उन्मेष पाटील हे 2 लाख ११ हजार ५१६ मतांसह आघाडीवर आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांना ८१ हजार ५६१ मते आहेत.

११.३८ : आठव्या फेरीअखेर उन्मेष पाटील १ लाख ५२ हजार तर रक्षा खडसे १ लाख ५० हजार मतांसह आघाडीवर

११.००: सहाव्या फेरीअखेर उन्मेष पाटील १ लाख २२ हजार तर रक्षा खडसे ८० हजार मतांसह आघाडीवर

१०.२१: उन्मेष पाटील यांना ७८७३७ तर रक्षा खडसे ४९५०० मतांसह आघाडीवर आहे.

११.३८ : आठव्या फेरीअखेर उन्मेष पाटील १ लाख ५२ हजार तर रक्षा खडसे १ लाख ५० हजार मतांसह आघाडीवर

११.००: सहाव्या फेरीअखेर उन्मेष पाटील १ लाख २२ हजार तर रक्षा खडसे ८० हजार मतांसह आघाडीवर

१०.२१: उन्मेष पाटील यांना ७८७३७ तर रक्षा खडसे ४९५०० मतांसह आघाडीवर आहे.


९.५९: भाजपचे दोन्ही उमेदवार आघाडीवर- उन्मेष पाटील ७८०००, रक्षा खडसे ४९०००

९.१५ वाजेपर्यंत रक्षा खडसे आघाडीवर होत्या. त्यांना २५३९८ तर आघाडीचे उमेदवार उल्हास पाटील १५०९८ मते मिळाली होती.

९.21 मिनिटाला जळगाव लोकसभा मतदार संघातून उन्मेष पाटील यांना २९९२७ तर गुलाबराव देवकर यांना ११ हजार ४११ मते आहेत. एकंदरीत उन्मेष पाटील आघाडीवर आहे.