पारोळा येथे युतीचे उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

0

शिवसेनेचे माजी आ. चिमणराव पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

पारोळा – पारोळा मार्केट कमिटी समोर भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पारोळा मतदार संघाचे माजी आमदार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी आबासाहेब चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार ज्येष्ठ नेते गोविंद शिरोळे सुरेंद्र बोहरा, गोपाल अग्रवाल, बाळासाहेब पवार,उपनगराध्यक्ष कैलास चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अतुल मोरे, भाजप शहराध्यक्ष मुकुंदा चौधरी, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आर. बी. पाटील, शहराध्यक्ष अशोक मराठे, आरपीआयचे केदार अप्पा, पुंजू बिर्‍हाडे यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करू या. एक वचनी भगवान रामाच्या नावाने आपण सर्वांनी एक मताने काम करू या असे आवाहन माजी आमदार चिमणराव पाटील यांनी केलेे. यावेळी भाजप गटनेते बापू महाजन, शिवसेना गटनेते दीपक अनुष्ठान, शहर विकास आघाडीचे नेते गोपाल अग्रवाल, भाजपचे नगरसेवक नवल चौधरी, अंजली पवार, जयश्री बडगुजर, भावडू राजपूत, नगरसेवक मंगेश तांबे, डी.बी. पाटील, सुधाकर पाटील , शिवसेनेचे संजय पाटील, शहर विकास आघाडीचे नगरसेवक मनीष पाटील, अशोक चौधरी, नीतीन सोनार, जि.प.सदस्य रोहिदास पाटील, सुजाता पाटील, शेतकी संघाचे चेअरमन पोपटराव नाईक, बाजार समितीचे उपसभापती प्रेमानंद पाटील, भाजप ज्येष्ठ नेते दत्तू भावसार, भोमा पाटील, पांडू चौधरी, प्रकाश लोहार, भगवान दाजी, दीनेश लोहार, बापू नावरकर, माजी नगरसेवक संजय पाटील,संजय चौधरी, राजेंद्र पाटील, सुदामा चौधरी, माजी सरपंच दिलीप पाटील डॉ. असिफ कुरेशी, मोहंमद खान, रवींद्र महाजन, प्रसाद महाजन उपस्थित होते.

एक दिलाने देऊ एक लाखाचा लीड : माजी आमदार चिमणराव पाटील यांचा निर्धार
प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करू या एक वचनी भगवान रामाच्या नावाने आपण सर्वांनी एक मताने काम करू या असे आवाहन माजी आमदार चिमणराव पाटील यांनी केले आहे.आता युती झाली आहे. त्यामुळे युतीचे उमेदवार आमदार उन्मेष दादा पाटील यांचा विजय पक्का आहे. उन्मेष दादा तुम्ही काळजी करू नका एक लाखांचा लीड आम्ही देऊ तुम्ही प्रचाराची चिंता करू नका. भाजप सेना आरपीआय सर्वांची मने जुळली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी उन्मेष दादा पाटील यांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

युतीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार
यावेळी भाजप गटनेते बापू महाजन , शिवसेना गटनेते दीपक अनुष्ठान , शहर विकास आघाडीचे नेते गोपाल अग्रवाल,भाजपचे नगरसेवक नवल चौधरी, अंजली ताई पवार ,जयश्री बडगुजर, भावडू राजपूत, नगरसेवक मंगेश तांबे, डी बी पाटील सर, सुधाकर भास्कर पाटील , शिवसेनेचे संजय पाटील, शहर विकास आघाडीचे नगरसेवक मनीष पाटील, अशोक चौधरी, नीतीन सोनार, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहिदास पाटील, सुजाता पाटील, शेतकी संघाचे चेअरमन पोपटराव नाईक, बाजार समितीचे उपसभापती प्रेमानंद पाटील, भाजप ज्येष्ठ नेते दत्तू भावसार, भोमा सांडू पाटील, पांडू वामन चौधरी, प्रकाश लोहार , भगवान दाजी, दीनेश लोहार, बापू नावरकर, माजी नगरसेवक संजय बुधा पाटील,सजय चौधरी, राजेंद्र पाटील, सुदामा चौधरी, माजी सरपंच दिलीप पाटील डॉ असिफ कुरेशी, मोहंमद खान, रवींद महाजन, प्रसाद महाजन, यांच्या सह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.