[व्हिडीओ] एमआयडीसी परिसरातील जी सेक्टरमध्ये आगीचा हाहाकार

0

रवी इंडस्ट्रीज, अविजिता कंपन्या आगीच्या भक्षस्थानी

जळगाव- शहरातील एमआयडीसी परिसरात रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जी.सेक्टरमधील रवी इंडस्ट्रीज कंपनीला अचानक आग लागली. कंपनीतील केमिकलचे टाक्या फुटून आगीच काही मिनिटात भिषण आगीत रुपांतर झाले. काही वेळातच रवी इंडस्ट्रीज या कंपनीसह तिच्या बाजूची अविजिता इंटरप्रायझेस ही प्लास्टिकचे पीव्हीसी पाईप बनविणारी कंपनीच्या आगीच्या लपेट्यात सापडली. जसे जसे कंपनीतील केमिकल बाहेर पडत होते. त्यापध्दतीने आग पसरत होती. घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटरपर्यंत नालीतून वाहणार्‍या केमिकलला आग लागली होती. जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचत असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

केमिकलची ३ हजार लिटरच्या टाकीचा धोका

जी सेक्टर ४५ ही रवि इंडस्ट्रीज ही कंपनी रविंद्र पाटील असल्याचे कळते. जी. सेक्टरमध्ये केमिकलला परवानगी नाही, तरीही या कंपनीत केमिकलचे रिफायनरींग केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अशाप्रकारे विनापरवानगी केमिकलचा वापर झाल्याने त्यातून ही मोठी दुर्घटना घडली आहे. काही वेळातच नव्हते होवून शेजारील सर्व कंपन्या आगीच्या विळख्यात सापडल्या. रवी इंडस्ट्रीजमधील केमिलकची ३००० हजार लिटरची टाकी फुटली तर संपूर्ण जी सेक्टर खाक होईल अशी ही भिती येथील उपस्थित कामगारांकडून व्यक्त केली जात होती.

सुदैवाने कुटूंब वाचले अन्यथा दुर्घटना घडली असती

रवि इंडस्ट्रीज या कंपनीच्या बाजूला नवीन बेहडे यांच्या मालकीची पाईप बनविणारी अविजिता इंटरप्रायझेज ही कंपनी आहे. बेहडे हे कुटुंबासह कंपनी आवारातील घरातच वास्तव्यास आहेत. आग लागली त्यावेळी संपूर्ण कुटुंब घरात होते. बेहडे यांनी तत्काळ त्याची पत्नी, आई, भाऊ तसेच वहिनी यांचा घराबाहेर काढले. यावेळी साडेतीन वर्षाची त्यांची चिमुकली काव्याही घरात होती. तिला बेहडे यांनी स्वतःच्या अंगावरील कपडे काढून वाचविले. कुटुंब सुखरुप बाहेर निघाली अन् काही वेळातच बेहडे यांची कंपनीही आगीच्या लपेट्यात आली.