बेरोजगारीविरोधात केंद्र सरकारचा निषेध
जळगाव – केंद्रशासनाने नोटबंदी केल्याने बेरोजगारी वाढली असून अनेक उद्योग व्यवसाय बंद पडले यांच्या निषेधार्थ आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज थाळीनाद मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येऊन केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
नोटाबंदीमुळे अनेकांना बेरोजगार व्हावे लागले असून अनेक छोटे-मोठे उद्योग देशोधडीला गेले आहे. आजच्या घडीला महाराष्ट्रातील शासनाच्या १९ कंपन्या बंद झाल्या असून ३० लाखाहून अधिक लोकं बेरोजगार झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात असलेल्या शेतकर्यांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याची टीका राष्ट्रवादीकडून करून सरकारच्या विरोधात थाळीनाद आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांनी केले. यावेळी अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफार मलिक, जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले, प्रदेश सरचिटणीस सत्यजित शिसोदे, जळगाव शहराध्यक्ष अभिषेक पाटील, ग्रामीणचे अध्यक्ष ललित बागूल आदी उपस्थित होते.
महाजनांनी आपल्याच पक्षातील लोक संपविले
भाजपाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी विरोधी पक्ष फोडून आपल्याच पक्षातील लोक संपविले असल्याची टिका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांनी आज पत्रकार परीषदेत केली. इतरांचे पक्ष फोडण्यापेक्षा महाजनांनी राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करावे असा टोलाही त्यांनी लगावला.