जळगावात दुपारच्या उकाड्यानंतर ढगांच्या गडगडाटासह पाऊस

जळगाव प्रतिनिधी।

श हरात गेल्या काही दिवसांपासून किमान व | कमाल तापमानात प्रचंड वाढ होत आहे. दुपारी आकाश निरभ्र होते अन् साडेतीन वाजता अचानक आकाशात ढग जमा झाले आणि पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या जळगावकरांना या जलधारांनी थोडासा दिलासा मिळाला.

दरम्यान, पूर्वी जळगावात उन्हाळ्यात किमान तापमान ३८ अंशाच्या आसपास असायचे. परंतु, आता हे तापमान ४१ च्याही पुढे जात आहे. अजून संपूर्ण मे महिना यायचा असून, आताच सकाळी देखील प्रचंड उकाडा जाणवत आहे.

उष्माघाताचा परिणाम नागरिकांवर होऊ लागला आहे. त्यामुळे शक्यतो दुपारी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाकडून करण्यात येत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून शहरातील ठिकठिकाणचे तापमान नोंदविले जात आहे. त्यासाठी खास स्टेशन्स उभारले आहेत. शहरात महापालिका, आयएमडी आणि जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा आहे. जळगाव शहरासह राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयात हवामानशास्त्र विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये या लाटेविषयीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.