पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांची पत्रकार परिषदेत माहिती ; आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमिवर ; जळगावातील 38 आरोपींचा तडीपारांमध्ये समावेश
जळगाव- आगामी काळातील गणेशोत्सव तसेच मोहरम या सणाच्या पार्श्वभूमिवर जिल्हा पोलीस दलातर्फे गेल्या तीन वर्षात जिल्हाभरातून 74 जणांना तडीपार करण्यात आले असून 71 जणांवर तडीपारीच्या कारवाईची प्रकिया सुरु आहे. तसेच जिल्ह्यातील उपद्रवी गुन्हेगारी टोळ्यांची माहिती जमा करण्यातचे काम सुरु असून लवकरच या टोळ्यांवरीही तडीपारीचीही कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या गुन्ह्यांना आर्थिक पाठबळ देणारे तसेच प्रत्यक्ष किंवा पदड्यामागचेही रडारवर त्यांचावरीह पोलीस दल लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे गोपनीय रेकार्ड अपडेट करण्याचे काम सुरु असून प्रत्येकाला पोलिसांच्या रेकार्डवर घेण्यात येणार असल्याचा इशारा डॉ. पंजाबराव उगले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
पोलीस अधीक्षक यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांचीही उपस्थिती होती. यावेळी डॉ. उगले यांनी 2017, 2018 तसेच यंदाचे वर्ष 2019 या वर्षामध्ये जिल्हयातून तडीपार करण्यात आलेल्या आरोपींबाबत माहिती दिली. तसेच आगामी काळातील उत्सवांमध्ये सोशल मिडीया तसेच इतर माध्यमातून अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दलातर्फे विशेष खबरदारी घेण्यात आली असून यंदा प्रथमच बंदोबस्तसाठी रॅपीड अॅक्शन फोर्स मागविण्यात आला. तसेच विसर्जन मार्गावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेर्यांची नजर राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्सव आनंदाने साजरा करतांना कायदा व सुव्यव्यस्थेचेही पालन करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी केले.
डी.जे.बसवून मॉडिफाईड केलेल्या वाहनांवर कारवाई
डी.जे.चालक बेकाशदेशीरपणे विना परवाना वाहने मॉडीफाईड करत असल्याचे समोर आले आहे. त्यानुसार सोमवारी 8 वाहने जप्त करण्यात आली आहे. ही वाहने आरटीओ विभागाच्या ताब्यात देवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनांमध्ये डी.जे.सेट बसवून ध्वनीप्रदुषणाबाबत मानदंडाचे ÷उल्लंघटन करणार्या वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 52 व 190 (2) कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाभरासह इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, पोलीस दूरक्षेत्र यांनाही सुचना करण्यात आल्या असून जिल्ह्यातील वाहने आढळून आल्यास तत्काळ कळविण्याचे सांगण्यात आले असल्याचेही डॉ. पंजाबराव उगले यांनी यावेळी सांगितले.
आक्षेपार्ह मजकूर पसविणार्यांची गय नाही
व्हॉटस्अॅप, ट्विटर, तसेच फेसबुकच्या माध्यमातून जाती धर्माच्या भावना दुखविले जाणारे संदेश पसरविले जातात. अशा प्रकारे संदेश पसरविणार्यांवर पोलीस विभागाची करडी नजर राहणार असून अशाप्रकारे जाती धर्माच्या भावना दुखवणारे व्हीडीओ किंवा छायाचित्र पसरवतील, प्रसारीत करतील, लाईक, शेअर किंवा त्यावर कॉमेंट करतील, अशा कुणाचीही गय केली जाणार नसून त्यांच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल असेही यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
11 दिवस श्रींची स्थापना करणारे सर्वाधिक 1529 मंडळ, 105 गावे
जिल्हयात 3 दिवस, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस, 8 दिवस 9, दिवस, 10 दिवस तसेच 11 दिवस अशाप्रकारे गणेशाची स्थापना करण्यात येवून विसर्जन करण्यात येते. यात 2 सार्वजनिक तसेच 8 खाजगी अशा 10 मंडळांनी 3 दिवसांच्या गणपतीची स्थापना केली आहे, 136 सार्वजनिक, 34 खाजगी अशा 170 मंडळांनी 5 दिवसाच्या गणपतीची स्थापना केली आहे, 6 मंडळांनी 6 दिवसांच्या, 293 मंडळासह एक गाव एक गणपती असलेल्या 11 गावांनी 7 दिवसाच्या गणपतीची स्थापना केली आहे. 22 मंडळ तसेच एका गावाने 8 दिवसांच्या गणेशाची, 117 ममंडळांनी तसेच 5 गावांतर्फे 9 दिवसाच्या, 33 मंडळांनी तसेच 13 गावांनी 10 दिवसाच्या तर 1529 मंडळांनी तसेच 105 गावांतर्फे 11 दिवसांची स्थापना करण्यात आली आहे.
मोहरममध्ये निघणार 854 सवारी
आगामी काळात मोहरम सण साजरा होत असून यात 854 सवारी, 36 ताबुत, 33 वाघ, पंजे 1, परी 3, 9 डोले ईतर 58 असे प्रकार होणार असून 159 सवारीचे जागेवर विसर्जन, मिरवणुक संख्या 835 अशा असून मोहरम 05 व्या दिवशी स्थापन, अशा प्रकारे मुस्लिम समुदाय मोहरम सण साजरा करणार आहे.
3 वर्षात जिल्ह्यातून 71 हद्दपार, जळगावातील 38 आरोपी
गेल्या दोन वर्षात म्हणजे 2017 मध्ये 12 तेर 2018 मध्ये 13 तर 2019 मध्ये 49 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती. अशाप्रकारे हद्दपार आरोपींची संख्या आता 74 वर पोहचली आहे. 74 मध्ये जळगाव शहरातील 38 एकूण आरोपींचा समावेश आहे. तर यावर्षी तडीपार करण्यात आलेल्या मध्येही 49 मध्ये 12 जण हे जळगाव शहरातील आहेत. तसेच 71 जणांवरही तडीपारीची कारवाईची प्रक्रिया सुरु असल्याचेही यावेळी डॉ. उगले यांनी सांगितले.