जम्मू-काश्मीरात हिमस्खलन; १० पोलीस कर्मचारी बर्फाखाली अडकले

0

कुलगाम-जम्मू-काश्मीरमधील कुलगाम परिसरात काल गुरूवारी सांयकाळी झालेल्या हिमस्खलनात १० पोलीस कर्मचारी बर्फाखाली दबले गेले आहे. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर लष्कर आणि एनडीआरएफचे पथकही सहभागी झाले आहे.

कुलगाम जिल्ह्यातील जवाहर बोगद्याजवळ गुरूवारी सांयकाळी पोलीस कर्मचारी हिमस्खलनात अडकले गेले. यावेळी अनेक पोलीस कर्मचारी सुरक्षित बाहेर पडले. पण १० जण बर्फाखाली दबले गेले. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आली. .