जम्मू-काश्मीर :- जम्मू-काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी जम्मू-काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष कविंदर गुप्ता हे उपमुख्यमंत्री असतील. आज मेहबुबा मुफ्ती मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार असून यात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता आहे. आज दुपारी १२ वाजेला मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांना राज्यपाल एन.एन.व्होरा यांच्या हस्ते गोपनियतेची शपथ दिली जाणार आहे.
राज्य सरकार वर्षांत दोन वेळा आपले सचिवालय बदलत असते. सहा महिने श्रीनगर येथून तर ६ महिने जम्मू येथून कामकाज चालते. पीडीपीचा सहकारी पक्ष असलेल्या भाजपाकडून दोन रिक्त जागा भरण्याशिवाय काही जुन्या मंत्र्यांना हटवून नव्यांचा समावेश केला जाऊ शकतो. मंत्रिमंडळातून किती मंत्र्यांना हटवले जाणार किंवा सामील करून घेतले जाणार याची संख्या स्पष्ट नाही.
#JammuAndKashmir Deputy Chief Minister Nirmal Singh resigns pic.twitter.com/uMFj2kkVny
— ANI (@ANI) April 29, 2018