शुजात बुखारी यांच्या मारेकरींचे छायाचित्र प्रसिद्ध

0

श्रीनगर – बुधवारी रात्री अज्ञात दहशतवाद्यांनी रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या केली. जम्मू काश्मीर पोलिसांनी त्यांच्या संशयित मारेकऱ्यांचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. मोटारसायकल चालवणाऱ्या ३ माणसांची २ छायाचित्रे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. तिन्ही माणसांनी त्यांचे चेहरे झाकलेले आहेत. बुखारी यांचे मारेकरी पकडण्यासाठी सामान्य नागरिकांनी मदत करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी कार्यालयातून घरी परतत असताना मारेकऱ्यांनी बुखारीवर गोळीबार केला, त्यातच त्यांचा मृत्यू झाला.