च-होली :- येथील एसीई-आस्था टाऊनशिप या प्रकल्पाचे भूमिपूजन मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. जमतानी व साईराज ग्रुपच्या वतीने च-होली येथील आस्था टाऊनशिप प्रकल्प साकारण्यात येत आहे.
सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध
एसीई आस्था जमतानी व साईराज ग्रुपचा हा टाऊनशिप प्रकल्प च-होलीतील तापकीरनगर या भागात पाच एकर जागेत साकारला जात आहे. या प्रकल्पाचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे येथे सर्वसामान्यांना परवडतील, अशा दरात घरे उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पात घरे घेणा-या नागरिकांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेकडून दोन लाख 60 हजार रुपयांची सबसिडी मिळविता येणार आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, किसन महाराज तापकीर, दीपक राहींज, मारुती बहिरवाडे आदी उपस्थित होते.
पाच एकर जागेत उभारणार प्रकल्प
महापालिकेच्या 30 मीटर विकास आराखड्यातील रस्त्याला लागून एकूण पाच एकर जागेत हा प्रकल्प उभारणार असून यात वन व टू बीएचके फ्लॅटस उपलब्ध होणार आहेत. ए व बी अपार्टमेंटस लॉन्च झाले असून त्यात 280 सदनिका आहेत. तर पाच एकर जागेत 560 सदनिका आहेत. याची वैशिष्ट्ये म्हणजे सीसीटिव्ही कॅमेरे, सोलर वॉटर हिटर, मंदिर, चिल्ड्रन प्ले ग्राऊंड, जॉगिंग ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी पार्क अशा विविध सोयी-सुविधा या एसीई आस्था टाऊनशिप प्रकल्पात आहेत.