जनशक्ती विशेष : शिळी चपाती खाण्याचे फायदे

एका जागतिक संस्थेच्या संशोधनानुसार भारतात सुमारे ४० टक्के अन्न वाया जाते. भारतात अजूनही कित्येक लोक अशे आहेत जे २ वेळेस जेवू शकत नाही ते उपाशी राहतात. यामुळे नागरिकांनी शिळ अन्न फेकून देणे चूक आहे.

डायबिटीस रुग्णांसाठी फायदेशीर
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार डायबिटीसच्या रुग्णांसाठी शिळ्या चपातीचा नाश्ता फायदेशीर ठरतो. रोज सकाळी दुधाबरोबर शिळी चपाती खाल्लानं शरीरातील साखरेचं प्रमाणत नियंत्रणात राहतं. याशिवाय छातीतील जळजळीचा त्रासही कमी होतो.

हाय ब्लड प्रेशर
ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठीही शिळी चपाती फायदेशीर ठरते. सकाळच्यावेळी थंड दुधासह शिळी चपाती खाल्ल्यानं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते

अॅसिडीटीपासून आराम
गॅस, अॅसिटीटी यांसारख्या पोटाच्या समस्यांवर शिळी चपाती गुणकारी ठरते. सकाळच्यावेळी दुधासह शिळ्या चपातीचं सेवन केल्यानं अॅसिडीटी आणि अपचनाची समस्या नियंत्रणात ठेवता येते.

व्यायामासाठी फायदेशीर
जिमला जात असलेल्या लोकांनी शिळी चपाती खाल्ली तर फायदेशीर ठरते. अनेक फिटनेस सेंटरमध्ये सकाळी शिळी चपाती खाण्याचे फायदे दिले जातात. यात असणारे बॅक्टिरीया शरीर निरोगी ठेवण्यासाठी लाभदायक ठरत असतात. नियमित शारीरिक कसरत किंवा व्यायाम भरपूर करतात. अश्या व्यक्तींसाठी शिळ्या चपातीचे सेवन हे शरीराला त्वरित उर्जा देणारे आहे.