जान्हवी कपूरने आईच्या आठवणी केल्या पुन्हा ताज्या

0

मुंबई-श्रीदेवी याचं अचानक निधन झाले. ही बाब सगळ्यांना चटका लावून गेली. श्रीदेवीच्या निधनाला तीन महिने उलटले आहे. मात्र अद्यापही त्यांच्या आठवणी ह्या ताज्या आहेत. दरम्यान श्रीदेवींची मोठी मुलगी जान्हवी कपूर यांनी आईची आठवण पुन्हा ताजी केली आहे. जान्हवी कपूरने श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल केले आहे. यात बोनी कपूर व श्रीदेवी गळा भेट घेत असून प्रेम व्यक्त करत आहे.

जान्हवी कपूर स्वर्गीय श्रीदेवी आणि बोनी कपूरची मोठी मुलगी आहे. लवकरच अभिनेत्री म्हणून आपल्या पहिलाच चित्रपट ‘धडक’सह या जुलैमध्ये ग्लिट्झ आणि ग्लॅमरस अशा बॉलीवूड जगात प्रवेश करत आहे.

सोबतच जान्हवीने लहानपणी आई श्रीदेवी सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात ती खूप गोंडस दिसती आहे.