टोकियो- पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर आहेत. मोदींच्या जपान दौऱ्याचे फलित म्हणूनच जपानने भारतातील सात प्रमुख आधारभूत प्रकल्पांसाठी 316 अब्ज येनचे कर्ज प्रदान देण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, दिल्ली, उत्तर-पूर्व आणि चेन्नईमधील प्रकल्पांचा समावेश आहे. टोकियोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे शिंजो आबे यांच्यात चर्चा झाली. वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेनंतर ही घोषणा करण्यात आली.
दोन्ही देशाच्या परस्परसंबाधाबाबत विस्तृत चर्चा यावेळी करण्यात आली. दोन्ही देशांमध्ये परस्पर संवादाबाबत सहकार्य करण्याबाबत चर्चा करण्यात आली. भारतीय नौसेना आणि जपानी समुद्र सुरक्षा दलात मैत्रीपूर्ण संबंध ठेऊन देवाण घेवाण करण्याबाबत यावेळी एकमत झाले.