चाळीसगावात सप्टेंबरमध्ये शासकीय योजनेची जत्रेचे आयोजन
चाळीसगांव – शासकीय योजनेची जत्रा कार्यक्रमातून जनतेला एकाच छताखाली शासकीय योजनेचा अधिकाधिक लाभ देण्यात आला. जवळपास सर्वच विभागातून नागरिकांना दिलासा मिळाला. या जत्रेची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. शासनाच्या योजना राबविण्याचा लोकप्रतिनिधींचा प्रामाणिक प्रयत्नाला प्रशासनाने भक्कम साथ दिल्याने लाखभर गरजूंना वैयक्तिक लाभ दिल्याने तालुका आघाडीवर आहे याचा अभिमान आहे. शासन ,प्रशासन व लोकप्रतिनिधी मिळून लवकरच शासकीय योजनेची जत्रा आणि कृषी व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून उर्वरित व नव्याने सुरू झालेल्या शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असून त्याचा १५ जुलै पासून शुभारंभ करण्यात येईल अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी दिली.
आज दुपारी एक वाजता तहसील कार्यालयात आयोजित तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार उन्मेष पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी अतुल पाटील, निवासी तहसीलदार विशाल सोनवणे,नायब तहसीलदार नानासाहेब आगळे, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे, सदस्य सुनील पाटील,कपिल पाटील पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका कृषी अधिकारी सी. डी. साठे, पाटबंधारे विभागाचे सचिन पाटील, सहाय्यक निबंधक पी. बी. बागुल, एस. टी. डेपो व्यवस्थापक संदीप निकम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी, प्रतिनिधी उपस्थित होते.आढावा बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन निवासी तहसीलदार विशाल सोनवणे यांनी केले. प्रांताधिकारी शरद पवार यांनी शासकीय योजनेची जत्राबाबत मार्गदर्शन केले. तहसीलदार अतुल मोरे यांनी आभार मानले.