प्रतिनिधी । शिंदखेडा :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सन २०२२-२३ च्या गुणवत्ता यादीत येण्याचा दबदबा शिंदखेडा येथील विद्यार्थ्यांनी कायम केला आहे. या परीक्षेत तालुक्यातील तीनही केंद्रावरून एकूण ८८२ विद्यार्थ्यांनी प्रविष्ठ होऊन जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिली होती. नवोदय समितीच्या नियमाप्रमाणे दरवर्षी ८० विद्यार्थी जिल्ह्यातून निवडले जातात. त्यांत संविधान विजय मोरे (सप्तर्षी इंग्लिश स्कुल, वर्षी) , दर्शन महेंद्र सिसोदे (व्ही के पाटील इंटर नॅशनल स्कुल शिंदखेडा) , हितेश भटु सिसोदे (गो स देवकर विद्यालय विरदेल) , कु काव्यांजली संतोष कोळी ( गो स देवकर विद्यालय विरदेल ) , देवेन प्रशांत मोरे (हस्ती वर्ल्डस स्कुल दोंडाईचा) , चैतन्य अरुण पाटील ( गुरुदत्त हायस्कुल, वायपूर) , लोकेश उमाकांत देसले (एन डी मराठे विद्या. शिंदखेडा) , प्रशांत प्रकाश चौधरी (एन डी मराठे विद्या. शिंदखेडा ), लैश्राम धिमंत सिंघा (व्ही के पाटील इंटर नॅशनल स्कुल शिंदखेडा) यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना गुरुकुलाचे अध्यापक संजयकुमार उमेशचंद्र महाजन यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची सतत २२ वर्षापासूनची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे समाजातील निरनिराळ्या स्तरांतून अभिनंदन होत असून ग्रामीण भागातील विद्यार्थी यशाला गवसणी घालून आपले स्वप्न साकार करून आपल्या गावाचे व शाळेचे नाव उज्वल करीत आहेत.