चेन्नई-तमिलनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर २०१६ मध्ये अपोलो या रुग्णालयात ७५ दिवस उपचार सुरु होते. यादरम्यान ६ कोटी ८५ लाख रुपयाचे बिल आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे केवळ जेवणासाठी १ कोटी १७ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर परिस्थितीची चौकशी करणाऱ्या न्या.ए अरुमुघस्वामी आयोगाने ही माहिती दिली. जयललिता यांच्या एआईडीएमके या पक्षाने ६ कोटी रुपये भरले असून अद्याप ४४.५६ लाख रुपये दिलेले नाही.
दिवगंत जयललिता यांच्या निकटवर्तीयांसाठी ५५०० पासून ३० हजार रुपयापर्यंतचे २० खोल्या ६०-७० दिवस भाड्याने घेण्यात आल्या होत्या.
जयललिता यांच्यावर उपचार करणारे लंडन येथील डॉ.रिचर्ड बेले यांच्यावर ९२ लाखाहून अधिक खर्च झाला आहे.
विशेषबाब म्हणजे ४८.४३ लाख रुपये माध्यमांवर खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. २५.८ लाख रुपये पोलीस कर्मचाऱ्यांवर खर्च झाले. १९ लाख रुपये सचिवालय कर्मचाऱ्यांवरील खर्च, १७.८ लाख रुपये व्हीआयपी सुरक्षेसाठी खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे.